-->
शारदा विद्यालय तुमसर येथे केंद्रस्तरीय सभा संपन्न.

शारदा विद्यालय तुमसर येथे केंद्रस्तरीय सभा संपन्न.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्त प्रतिनिधी 

तुमसर :- दि. 6 नोव्हेंबर 2025 — नगर परिषद केंद्रातील सर्व व्यवस्थापन शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा आज दुपारी 2.00 वाजता शारदा विद्यालय, तुमसर येथे पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान मा. सौ. अर्चना माटे, गट शिक्षण अधिकारी, प. स. तुमसर यांनी भूषवले, तर प्रकाश साठवणे, शिक्षण विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक राहुल डोंगरे, शारदा विद्यालय तुमसर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सभेच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. मा.  प्रकाश साठवणे सर यांनी शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्रीडासंदर्भात मार्गदर्शन केले.मा. अर्चना माटे (BEO) यांनी विकसित भारत अभियान, शिष्यवृत्ती योजना, शालेय पोषण आहार, तसेच NMMS परीक्षेचे सखोल मार्गदर्शन केले.तसेच कु. बावनकार यांनी NMMS परीक्षा सराव वर्ग व Inspire Award संदर्भात माहिती दिली,
श्री. प्रकाश राऊत यांनी VSK आणि PAT बाबत मार्गदर्शन केले,
श्री. एस. डी. शरणागत यांनी मूल्य शिक्षण व प्रशिक्षण नियोजन यावर माहिती दिली,
श्री. रामरतन भाजीपाले (MIS Coordinator) यांनी UDISE+ संचमान्यता व सरळ स्कूल पोर्टल विषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय  शिक्षण विभाग पंचायत समिती तुमसरच्या वतीने  शारदा विद्यालय, तुमसर  येथे करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संगीता बागडे यांनी सहकार्य केले.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी मानले.

0 Response to "शारदा विद्यालय तुमसर येथे केंद्रस्तरीय सभा संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article