ओबीसी विद्यार्थी ना PhD करून काय दिवे लावणार म्हणणाऱ्या अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतःच्या पोराला सरकारी जमीन देऊन, २१ कोटी महसूल माफ करून चांगले दिवे लावले.
मंगलवार, 11 नवंबर 2025
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी एका वाक्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय संपवला होता –
“PhD करून हे लोक काय दिवे लावणार?”
पण आता दिसतंय, खरे दिवे तर अजित दादांनी स्वतःच लावलेत!
मुंढव्यातील महार वतनाची ४० एकर 1800 कोटी किंमतीची जमीन,जी कायदेशीररित्या राज्य सरकार ची आणी.. उपजीविकेसाठी महार बांधवाना दिलेली होती ती पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया इंटरप्रिंसेस एल एल पी ’ या कंपनीला अगदी खैरातीत दिली.
ही जमीन देण्यासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने विशेष शासन निर्णय काढला.त्याचबरोबर २१ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी पूर्णपणे माफ केली. म्हणजे एकीकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे नाहीत, ओबीसी हॉस्टेलला पुण्यात जागा नाही,
शिवभोजनाची बिलं थकलीत…आणि दुसरीकडे पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीला ४० एकर जमीन आणि २१ कोटींची सवलत! पार्थ पवार आणि जय पवार यांनी गेल्या काही वर्षांत १२ हून अधिक कंपन्या उघडल्या.
या कंपन्यांचे व्यवहार, भागभांडवल आणि जमीन खरेदी-विक्रीच्या नोंदी पाहता ‘शेल कंपन्या" तयार करून आर्थिक गैरव्यावहार, सरकारी जमिनी लुबाडणे असं प्रकार झाल्याचा संशय येतोय.अशा कंपन्यांद्वारे पैशांची उलाढाल आणि मनी लॉन्डरिंग होत असल्याची गंभीर तक्रार आहे.
प्रश्न एकच आहे –
ED विरोधकांच्या मागे धावते, पण पवार कुटुंबाच्या कंपन्यांना का सोडते? नैतिकता असेल तर अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
आणि पार्थ पवार-जय पवार यांच्या सर्व कंपन्यांची ED मार्फत, CBI मार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी.
२१ कोटी चा महसूल बुडवणारा... पार्थ पवार... कोणाचा पोरगा... तर राज्यला आर्थिक शिस्त लावायच्या बाता करणाऱ्या अर्थ मंत्री अजित पावरचा..
महार वतनाची सरकारी जमीन ढापतंय कोण तर... पुण्याच्या जमनींचा पालक असलेल्या पालक मंत्री अजित पवार चा पोरगा..
आहे का नाही गंम्मत..???
जनता आता जागी झालीय…
कसे दिवे लावलेत... अजित पवारांच्या दिवट्याने
0 Response to "ओबीसी विद्यार्थी ना PhD करून काय दिवे लावणार म्हणणाऱ्या अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतःच्या पोराला सरकारी जमीन देऊन, २१ कोटी महसूल माफ करून चांगले दिवे लावले."
एक टिप्पणी भेजें