त्या डॉ. कर्मचार्यांची होणार उच्चस्तरीय चौकशी.
रविवार, 30 नवंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदूर :- तालुक्यातील आसोला गाव चे पिडीत पती विवेक नंदू शहारे ने माझी पत्नी आणि बाळ डॉ. दत्ता ठाकरे कर्मचारी च्या निष्काळजीपणामुळे मरण पावले असे आरोप करत न्याय मिळण्यासाठी दि.25-11-2025 पासुन ग्रामीण रुग्णालय लाखांदूर च्या कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले होते.
उपोषणाची माहिती मिळताच प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी उपोषणाचृया दुसर्या दिवशी उपोषणाला भेट देऊन पिडीत उपोषणकर्ते ची विचारपूस केली आणि तसेच संबंधित डॉ. दत्ता ठाकरे सोबतच चर्चा करून वरिष्ठांना सादर प्रकरणांची उच्च स्तरीय समिती स्थापन करून चौकशी ची मागणी केली.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी मा.उपविभागीय अधिकारी साकोली यांनी उपोषणाला भेट देऊन पिडीत उपोषणकर्ते ची विचारपूस केली असता पिडीताने सांगितले की, दि. 18-8-2025 ला रात्री अंदाजे 8-30 वाजता पत्नी ला प्रसुती कळा लागली असल्याने ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे भरती केले होते, उपस्थित नर्स ने नार्मल आहे असे सांगून बेड वर तसेच ठेवले माझी पत्नी रिना ला प्रसुती कळा सुरू असताना रात्रभर कोणीही दवाखान्यात कोणीही लक्ष दिले नाही, दि.19-8-2025 दुसरा दिवसी सकाळी 7-45 वाजता प्रसुती झाल्यावर मेलेला बाळ आमच्या स्वाधीन केले आणि जास्त रक्तस्त्राव होत आहे असे सांगून भंडाऱ्याला रेफर केले.ॲम्बुलन्स गाडी मध्ये सोबत मी आणि माझी आई होती, ॲम्ब्युलन्स मध्ये कोणतीच सुविधा नव्हती डॉक्टर ही नाही आणि ऑक्सिजन ची सुविधा नव्हती. भंडारा ला जात असताना माझ्या पत्नीने मला सांगितले की डॉक्टर ने बाळाला जोराने बाहेर ओढून काढले म्हणून मला जास्त वेदना आणि रक्तस्त्राव होत आहे असे सांगितले.याचा अर्थ डॉ. दत्ता ठाकरे ने माझ्या पत्नीची जबरदस्तीने किंवा जाणुनबुजून प्रसुती करून माझ्या बाळ आणि बाळंतीण पत्नी ला मारले असा आरोप केला. कशी परिस्थिती दुसर्या कोणत्याही गरोदर माता किंवा रूग्णांवर येऊ नये म्हणून मी आमरण उपोषणाला बसलो आहे. अशा डॉक्टर कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुहा नोंद करून निलंबित करण्याची मागणी पिडीत पती ने केली.सबब विषयी सदर प्रकरणाबाबत उच्च स्तरीय चौकशी समिती गठण करण्यात येवून चौकशी करण्याबाबत न्याय देण्याचे आश्वासन मा.उपविभागीय अधिकारी साकोली यांनी दिले.
या वेळी मा.उपविभागीय अधिकारी साकोली,मा . पवार साहेब तहसीलदार लाखांदूर,पोलिस अधिकारी लाखांदूर,जयेंद्र देशपांडे रूग्णमित्र -जिल्हा उपाध्यक्ष प्रहार संघटना भंडारा, सोनटक्के प्रतिनिधी दिव्यांग प्रहार संघटना लाखांदूर, सुनील कहालकर प्रतिनिधी प्रहार संघटना लाखनी, इ. उपस्थित होते.
*प्रतिक्रिया :-*
माझी पत्नी आणि बाळ मृत दगावल्याने माझा परिवार उघड्यावर पडला,मला लवकरात लवकरात न्याय मिळवून द्यावा अन्यथा मी मा.जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा च्या समोर आत्महत्या करेन नाही तर पुन्हा आमरण उपोषणाला बसणार
0 Response to "त्या डॉ. कर्मचार्यांची होणार उच्चस्तरीय चौकशी."
एक टिप्पणी भेजें