भाजपच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपाचा दुपट्टा घातला....ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध...
रविवार, 30 नवंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्ह्यात आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.भंडारा शहरातील टाकळी येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये भाजपाच्या वतीने प्रचार सभा घेण्यात आली.या प्रचार सभेची सुरुवात करण्यापूर्वी भाजपा उमेदवार यांनी चक्क शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपाचा दुपट्टा घातला आहे. व हे व्हिडीओ वायरल होत असून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.तर दुसरीकडे आचार संहिता असताना आचार संहिता भंग झाल्याचं सुद्धा बोलले जात आहे. या भाजपच्या कृत्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात असून ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी तीव्र विरोध केला आहे.या सर्व प्रकारावर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Response to "भाजपच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपाचा दुपट्टा घातला....ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध..."
एक टिप्पणी भेजें