तालुक्यातील दिव्यांग बांधव धडकले तहसील कार्यालयात.
शुक्रवार, 28 नवंबर 2025
Comment
• दिव्यांगांना दोन महीण्याचे वाढीव मानधन जमा न झाल्याने आक्रोश
• तहसिलदारामार्फत मुख्यमंञी, सामाजिक न्याय मंञी, दिव्यांग आयुक्तांना दिला निवेदनातुन आंदोलनाचा इसारा.
"साप्ताहिक जनता की आवाज़"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
लाखांदुर :- तालुक्यातील दिव्यांग बांधवाना माहे आॅक्टोबर व नोंव्हेबर या महीण्यामध्ये जमा झालेले वाढीव मानधन जमा न झाल्याने शेकडो दिव्यांग दुखावले गेल्याने तालुका प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करीत सोमवारी २४ नोंव्हेबरला तालुका कचेरीवर धडकत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंञी, सामाजिक न्याय मंञी, दिव्यांग आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
प्राप्त निवेदनानुसार, महाराष्ट शासनाचे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या मंञिमंडळ बैठकीत दिव्यांग व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत आर्थिक मदत म्हणुन मिळणार्या मानधनात १५०० रुपयामध्ये अधिक १००० रू. वाढीव मानधन देण्याचा निर्णय झाला असता महाराष्ट शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत माहे आॅक्टोबर पासून दिव्यांगाना २५०० रु. मानधन वाटप संपुर्ण महाराष्ट राज्यात सुरू झाले. माञ, भंडारा जिल्हातील लाखांदुर तहसिलचे सबंधीत विभागाकडे सदर योजनेतर्गत वर्गवारीनुसार दिव्यांगाची वेगळी यादी अद्यायावत नसल्याने सबंधीत शासन विभागाकडे माहीती देण्यास तहसिल विभाग असमर्थ झाल्याने तालुक्यातील कुणाही दिव्यांगाना वाढीव मानधन प्राप्त झाले नाही.
दरम्यान, आॅक्टोबर मध्येच तालुक्यातील सर्व दिव्यांगाना सुचना करुन त्यांचे आधार कार्ड, बॅक, पासबुक, दिव्यांग प्रमाणपञ यूडीआयडी कार्डसह मागविण्यात आले. त्या सुचनेची दखल घेत तालुक्यातील १ हजार २०० हून असलेल्या दिव्यांगापैकी हजारोंनी सदर कागजपञे तहसिलचे सबंधीत विभागात सादर करण्यात आले. मात्र, १ हजार २०० लाभार्थ्यांमधून फक्त ४२५ लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झाली आहे. त्यामुळे संपूर्ण लाभार्थ्यांचे कागदपत्रे गर्हाळ झाली की काय? असा सवाल दिव्यांग बांधव उपस्थित करीत आहेत.
एकंदरीत, दिव्यांगाना माहे नोंव्हेबर महीण्याचे २० नोंव्हेबरला वाटप झालेले मानधन फक्त तालुक्यातील सर्वांचे बॅक खाती दोन हजार ५०० ऐवजी १ हजार पाचशे रू.जमा झाले. या एकदंरीत प्रकारामुळे तालुक्यात येणारे जवळपास २० ते २५ लाख रूपयांचा लाभ विस्कटला एक हजार २०० हून असणारे दिव्यांग बांधव वाढीव मानधनापासुन वंचित झाली. यामुळे दिव्यांग बांधवाना मिळणारे वाढीव मानधन हे सबंधीत कार्यालयाचे अयोग्य कार्यप्रणालीमुळे, हलगर्जी तथा कामचुकारपणा , अनियमितता व दप्तरदिरंगाईमुळे मिळाले नाही. यावरुन " भाड में जाये जनता, अपना पगार बनता" अशा स्टाईलने घोषणा करीत दिव्यांग बांधव तहसील कचेरीवर आक्रोशात धडकले.
सदर निवेदनाची दखल घेवुन मागण्याची तात्काळ पुर्तता न झाल्यास लाखांदुर तहसिल कार्यालयासमोर १५ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इसारा ही निवेदनातून देण्यात आला.
लाखंदुरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंञी, दिव्यांग आयूक्त मुंबई यांचेसह सबंधीत प्रशासकिय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करतेवेळी विकास गंगा दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर चून्ने, उपाध्यक्ष सदाशिव खेत्रे, सचिव श्रीधर राऊत, रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, शिवसेना तालुकाध्यक्ष विनोद ढोरे (उद्धव ठाकरे गट), सौरभ राऊत, गोपेश्वर देशमुख यांचेसह शेकडो दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "तालुक्यातील दिव्यांग बांधव धडकले तहसील कार्यालयात."
एक टिप्पणी भेजें