पवई आयआयटी कॅम्पसमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे 12 डिसेंबर होणार अनावरण.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
सोनू क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
मुंबई :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा पवई येथील - आयआयटी कॅम्पसच्या मुख्य इमारती मध्ये उभारण्यात आला असून या पुतळ्याचे उद्घाटन येत्या शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. समदास आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
पवई येथील मुंबई आयआयटी मधील एस सी एस टी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात
रामदास आठवले यांच्या हस्ते होणार अनावरण
आलेला आहे. पवई आयआयटी कॅम्पसच्या मुख्य इमारतीत तळ मजल्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे अनावरण शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता पवई आय आय टी च्या नंदन निलेकणी मुख्य इमारतीत तळमजल्यावर करण्यात येणार आहे. या पुतळ्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मुंबई आय आय टी चे संचालक प्रोफेसर शिरीष
वि. केदारे, उपसंचालक प्रोफेसर मिलिंद आत्रे, उपसंचालक रविंद्र गुडी प्रोफेसर नंद किशोर, प्रोफेसर के वी कृष्णराव रजिस्ट्रार गणेश बोरखडे आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई आय आय टी एस सी एस टी वेलफेअर असोसीएशनचे सर्व पदाधिकारी आहेत. आय आय टी मुंबई एस टी एस सी वेलफेअर असोसिएशन चै अध्यक्ष रमेश गायकवाड, सरचिटणिस पी एस पटेकर, उपाध्यक्ष संजय भोसले, प्रमुख सल्लागार विलास बेलेकर, खजिनदार तांडेल, प्रमुख सल्लागार निवृत्त कर्मचारी बाळ (पवई) गरुड आदिंनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.
0 Response to "पवई आयआयटी कॅम्पसमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे 12 डिसेंबर होणार अनावरण."
एक टिप्पणी भेजें