नागपूरमध्ये आयटकचा महामोर्चा; शासनाकडून मागण्या दखल न घेतल्याने टेकडीवर मुक्कामी आंदोलन सुरू.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
. महामोर्चा मध्ये कामगार कडाक्याच्या थंडीत
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
नागपूर :- आयटक महाराष्ट्रतर्फे नागपूर येथे काढलेल्या भव्य महामोर्च्यानंतरही कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने दखल न घेतल्याने आजपासून टेकडी परिसरात मुक्कामी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. हजारोंच्या संख्येने आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर, ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम व घरकामगार, कृषी विभागातील कर्मचारी, उमेद कर्मचारी, कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी तसेच औद्योगिक कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
शासनाने कोणताही ठोस प्रतिसाद न दिल्यामुळे संतप्त कामगारांनी “मागण्या मान्य झाल्याशिवाय जाणार नाही” या निर्धारासह रस्त्यावरच मुक्कामाला सुरुवात केली आहे. आंदोलक प्रत्यक्ष रस्त्यावर झोपून आंदोलन सुरू ठेवत असून लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आयटक महाराष्ट्रने उद्या सकाळी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील कामगार व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने नागपूर टेकडी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. आंदोलनकर्त्यांसाठी भोजन, भाजी–भाकरी सोबत आणण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
हे आवाहन आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ. श्यामजी काळे, कॉ. राजू देसले, कॉ. विनोद झोडगे, कॉ.देवराव चवळे ,कॉ. मुगाजी बुरुड, कॉ. दिलीप उटणे, कॉ. वनिता कापसे, ज्योती अंडरसहारे, कॉ. नयन गायकवाड, कॉ. मंगल पांडे, कॉ. मंदा डोंगरे, कॉ. संजय मंडवधारे, विजय बचाटे, कॉ. हमीदा शेख आदींनी संयुक्तपणे केले आहे.
कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले हे आंदोलन शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असून परिस्थिती अधिक ताणली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Response to "नागपूरमध्ये आयटकचा महामोर्चा; शासनाकडून मागण्या दखल न घेतल्याने टेकडीवर मुक्कामी आंदोलन सुरू."
एक टिप्पणी भेजें