-->
विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहार येथे विनम्र अभिवादन

विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहार येथे विनम्र अभिवादन

  संजीव भांबोरे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून पूज्यनीय भदंत विनयबोधी महाथेरो यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी  पूज्यनीय  भदंत विनयबोधी महाथेरो यांच्या उपस्थितीत विश्वरत्न ,परमपूज्य ,बोधिसत्व ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले . व सामूहिक त्रिसरण, पंचशील , बुद्ध वंदना घेण्यात आली   .यावेळी बौद्ध उपासक ,उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Response to "विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहार येथे विनम्र अभिवादन "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article