शोषणाला विरोध हेच खरे अभिवादन - डॉ राहुल भगत
शनिवार, 6 दिसंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा - समाजातील सर्व प्रकारच्या शोषणाला जोरकसपणे विरोध करण्याची भूमिका घेणे, हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल.' असे प्रतिपादन एस. एन. मोर महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातर्फे नुकताच 'डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राहुल भगत हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ रेणुकादास उबाळे व प्राणीशास्त्र विभागाचे डॉ अभिमन्यू शुक्ला हे उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ भगत म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नसून भारताच्या स्वातंत्र्याचे व उच्च विचारांचे प्रतीक ठरले आहेत. आज सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांचेच विचार स्वीकारावे लागतात. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, कायदेशास्त्र अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र अशा असंख्य क्षेत्रांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. त्यामुळे समाजातील शोषणाला नकार देणे हेच महामानवाला खरे अभिवादन ठरेल.
याप्रसंगी डॉ रेणुकादास उबाळे म्हणाले की, 'डॉ आंबेडकरांनी जातिव्यवस्था, वर्गव्यवस्था व पुरुषप्रधानता या सर्व बाबींना कठोर विरोध केला. भारताला लोकशाहीचे नवे मूल्य प्रदान केले. आजच्या पिढीने आंबेडकरांना जाती-धर्मात बंदिस्त न करता समतेचे प्रतीक म्हणून त्यांचा स्वीकार व अभ्यास करावा. असे केल्यास आपले विचार व्यापक व संवेदनशील होऊ शकतात.'
याप्रसंगी डॉ अभिमन्यू शुक्ला यांनी आंबेडकरांच्या विचार कार्यावर प्रकाश टाकला. तसेच आजच्या काळातील समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांचा आदर्श घ्यावा, असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालया
0 Response to "शोषणाला विरोध हेच खरे अभिवादन - डॉ राहुल भगत "
एक टिप्पणी भेजें