ग्रामसेवकावर ACB ची सापळा कारवाई – १५ हजारांची लाच स्वीकारताना पकडले.
शुक्रवार, 5 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- भंडारा जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी मोहाडी तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचायतीत सापळा कारवाई करून ग्रामसेवक प्रफुल्ल रतन गिरी (वय ४६) यांना १५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदाराने मे २०२५ मध्ये घरकुल योजनेअंतर्गत झालेल्या सेल्फ सर्वे संदर्भात घरकुल यादीत पहिल्या टप्प्यात नाव मंजूर करून देण्यासाठी आरोपी ग्रामसेवकाने १५ हजारांची लाचेची मागणी केल्याचा आरोप केला होता. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत २८ नोव्हेंबर २०२५ रोजी ACB भंडारा कार्यालयात तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर त्याच दिवशी पंचासमक्ष झालेल्या पडताळणीत आरोपी प्रफुल्ल गिरी यांनी लाच मागणीची स्पष्ट कबुली देत १५,००० रुपये स्वतः घेण्यास सहमती दर्शवली.
म्हणून भंडारा अँटिकरप्शन विभागाचे उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात
आज ४ डिसेंबर रोजी आरोपीच्या कार्यालयात ACB पथकाने सापळा रचला. त्यात आरोपीने तक्रारदाराकडून १५,००० रुपये प्रत्यक्ष स्वीकारले, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.लाच लुचपत विभागाने१५,०००/- रुपये लाच रकम व एम.आय कंपनीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला
आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू करून या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली . गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीची औपचारिक अटक केली जाणार आहे.
नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांनी मार्गदर्शन केले.
0 Response to "ग्रामसेवकावर ACB ची सापळा कारवाई – १५ हजारांची लाच स्वीकारताना पकडले."
एक टिप्पणी भेजें