अड्याळ येथे दिव्यांग व्यक्ति दिवस व स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा साजरा”
शुक्रवार, 5 दिसंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथे दिव्यांग व्यक्ती दिवस व स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था ही 1984 पासून कार्यरत असून मागील दोन दशकापासून दिव्यांग व्यक्तींच्या संशक्तीकरणासाठी तत्परतेने काम करीत आहे, दिव्यांग व्यक्तींचे समुदाय आधारित पुनर्वसन या प्रकल्पअंतर्गत संस्थेच्या मार्गदर्शनातून स्थापन झालेल्या समता दिव्यांग संघटना, अड्याळ दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दि. ०3 डिसेंबर २०२५ रोजी मंडई पेठ समाज भवन, अड्याळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
“०३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन" या वर्षाची जागतिक स्तरावर संकल्पना हि ‘सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांगत्व समावेशक समाजांना प्रोत्साहन देणे’ या संकल्पनेला ला लक्षात घेऊन साजरा करून दिव्यांगां प्रती समाजात जाणीव जागृती व्हावी, दिव्यांग व्यक्तिचे नेतृत्व वाढविणे, समाजात सर्वसमावेशक वातावरण निर्माण व्हावे, अधिकार व हक्क याला घेऊन माहिती व्हावी सोबतच दिव्यांग व्यक्तीवर, महिलांवर होणारी हिंसा याला घेऊन दिव्यांग व्यक्ति जागृत व्हावे या उद्देशाने “३डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन” आणि “जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा अभियान” तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन तर्फे मार्गदर्शन शिबीर चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने व प्रतिमांना पुष्पार्पणाने केली गेली. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले पवनी तालुका पंचायत समिती सदस्य सीमा गिरी , अड्याळ ग्रामपंचायतचे सरपंच शिवशंकर मुंगाटे, ग्रामसेविका पौर्णिमा साखरे , महिला संघटने सोबत सक्रिय काम करणाऱ्या समाज सेविका तारा कुंभलकर, दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथील समन्वयक बांते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार उपस्थित होते.
सर्व उपस्थितांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देत या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने तसेच लाखांदूर तालुक्यातील चुडाराम ठाकरे भाऊ आणि अशोक पिल्लेवार भाऊ हे दिव्यांग असून यांनी आज दिव्यांग दिना निमित्त गायन, पेटी वादन कला सादर केली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर मार्गदर्शनाला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम सरपंच साहेब शिवशंकर मुनगाटे यांनी दिव्यांगांशी संवाद साधत दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन आपल्या हक्का विषयी जागरूक राहून शासकीय योजना विषयक माहिती दिली. त्यानंतर ग्रामसेविका पौर्णिमा साखरे मॅडम यांनी सुद्धा दिव्यांगाना प्रेरित करीत उपस्थितांशी संवाद साधला.
जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा ची २०२५ या वर्षाची जागतिक स्तरावर संकल्पना हि “सर्व महिला आणि मुलींविरुद्ध डिजिटल हिंसाचार संपविण्यासाठी संयुक्त प्रयत्न” याला लक्षात घेऊन तारा कुंभलकर व सीमा गिरी मॅडम यांनी संवाद साधला, त्याच बरोबर दिव्यांग पुनर्वसन भंडारा येथून बांते यांनी दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध योजनांन विषयी माहिती दिली व त्यांचा प्रश्नांचे निराकरण केले.
जागतिक दिव्यांग दिनाचे महत्व काय आहे? या विषयी सुजाता कन्या विद्यालयातील सोनाली तलमले हिने यावर भाष्य केले. संस्थेच्या कार्याविषयी व उद्दिष्टांबाबत डॉ. सतीश गोगुलवार सर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर समाज आधारित दिव्यांग पुनर्वसन प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे आवाहन केले असून मार्गदर्शकांनी दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजना, कायदे, अधिकार यावर चर्चा केली.अडयाळ येथे आयोजित जागतिक दिव्यांग दिन व स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा कार्यक्रमाला दिव्यांग व्यक्तींचा उत्फुर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व प्रस्ताविका निधी धुर्वे, छाया तलमलें आणि समता दिव्यांग संघटना चे अध्यक्ष रुपेश तलमले यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवचंद बेलखोडे यांनी केले.
0 Response to "अड्याळ येथे दिव्यांग व्यक्ति दिवस व स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा साजरा”"
एक टिप्पणी भेजें