अंदाधुंद ट्रक चालकाने दुचाकी व चारचाकी वाहनांना ठोकले!.
सोमवार, 1 दिसंबर 2025
Comment
• तिघे गंभीर जखमी, पालांदूरच्या पुढे जेवणाळा जवळील घटना.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- अंदाधुंद ट्रक चालवीत हयगपणा केल्याने समोरून येणाऱ्या सायकल, दुचाकीस्वार व चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. यात तिन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. चंद्रभान श्रीराम गोंधोळे (६०) जेवणाळा, काजल विनोद गोटेफोडे (१५) जेवणाला, प्रशांत बोरकर (५१) लाखनी असे जखमींची नावे आहेत. ही घटना सोमवारला सकाळी दहा वाजेच्या सुमारास पालांदूरच्या पुढे जेवणाळा येथे विनायक बुरडे यांच्या शेताजवळ (फार्म हाऊस) जवळ घडली.
सकाळी दहा वाजेच्या सुमारास पालांदूर इथून ट्रक लाखनी कडे पशुखाद्य घेऊन निघाला. जेवणाळ्यावरून पालांदूर करिता आपापल्या साधनाने येत असताना गोसेखुर्दच्या कालव्याच्या पुलावर ट्रक चालकाचा नियंत्रण सुटला. त्याने प्रथम सायकल स्वार, दुचाकी स्वार व नंतर चार चाकी वाहनाला जबरदस्त धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरील माहितीनुसार, चालका मद्याधुंद अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे.
तीनही जखमींना पालांदूर येथील प्राथमिक खाजगी उपचार करून भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारात दाखल झाले आहेत. विद्यार्थिनीच्या डोक्याला, वयोवृद्धाच्या टोंगळ्याला तर कारचालकाच्या कंभरेला जबरदस्त दुखापत झाली आहे. वृत्त लिहीपर्यंत पालांदूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद व्हायला होती.
0 Response to "अंदाधुंद ट्रक चालकाने दुचाकी व चारचाकी वाहनांना ठोकले!. "
एक टिप्पणी भेजें