-->
जैन इंटरनॅशनल स्कूल च्या ग्यादरिंग तारखेत बदल.

जैन इंटरनॅशनल स्कूल च्या ग्यादरिंग तारखेत बदल.

• महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिनी द जैन इंटरनेशनल स्कूल गॅदरिंगचा 6 डिसेंबर नियोजित कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे निवेदन देताच शाळा प्रशासनाने तारखेत केला बदल ....

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क.

छत्रपती संभाजी नगर :- येथील द जैन इंटरनेशनल स्कूल, शहानुरवाडी गॅदरींगचा कार्यक्रम ६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित शालेय कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनामुळे पुढील तारखेत बदल करण्यात यावा असे निवेदन 1 डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी प्राचार्य यांच्याकडे सादर केले, द जैन इंटरनेशनल स्कूल शाळेचा गॅदरिंग कार्यक्रम दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता,  परंतु या तारखेबाबत एक महत्त्वपूर्ण अडचण शाळेच्या  निदर्शनात आणून दिले की दिनांक ६ डिसेंबर हा भारतरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे.

 हा दिवस संपूर्ण भारतात अत्यंत आदराने आणि शोकमय वातावरणात पाळला जातो. अनेक विद्यार्थी, पालक आणि नागरिक या दिवशी आदरांजली वाहण्यासाठी विविध सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात किंवा या दिनाचे गांभीर्य बाळगून इतर उत्सव टाळतात. या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय दिनाचे पावित्र्य आणि गांभीर्य लक्षात घेऊन, ६ डिसेंबर रोजीचा शालेय कार्यक्रम रद्द न करता, तो त्यापुढील एका योग्य तारखेस आयोजित करावा असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला होता. 
       द जैन इंटरनेशनल शाळेच्या प्राचार्या यांनी आपल्या कमिटीशी होणार्‍या कार्यक्रमा विषयी चर्चा करून रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या निवेदनाची दखल घेण्यात येवून नियोजित तारखेत बदल केल्याचे पत्र पक्षाला देण्यात आले आहे.
     यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहर अध्यक्ष रणजीत मनोरे, जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे, जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक, जिल्हा संघटक भीमराव गाडेकर, हन्नु नाना, कडुबा म्हस्के, बादशहा लखपती आदी शिष्टमंडळात सहभागी होते.

0 Response to "जैन इंटरनॅशनल स्कूल च्या ग्यादरिंग तारखेत बदल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article