घरकुल लाभार्थ्यांचे वाढीव ५० हजाराचे अनुदान लाभार्थ्यांना द्या
मंगलवार, 2 दिसंबर 2025
Comment
• सामाजिक कार्यकर्ता तथा माजी उपसरपंच स्वप्निल खंडाईत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने गोरगरिबांना घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे.१ लाख ५८ हजार रुपयाचे अनुदान नियोजित आहे. यात १ लाख २० हजार मूळ अनुदान, मजुरी २६ हजार रुपये, शौचालय १२ हजार रुपये समाविष्ट आहेत. यात पुन्हा ५० हजार रुपयाची वाढ शासनाने करीत गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. मात्र हा निर्णय अजून पर्यंत ग्रामीण पात्र लाभार्थ्यांना मिळालेला नाही. करिता तत्परतेने धोरणाची अंमलबजावणी करण्याचे नियोजन शासनाने करावे. अशी मागणी कवलेवाडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच स्वप्निल खंडाईत यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केले आहे.
वाढत्या महागाईचा विचार करता घरकुलाकरिता मिळणारे अनुदान हे तुटपुंजे आहे. वाढीव पन्नास हजाराच्या निधीत ३५ हजार रुपये घर बांधकामासाठी तर १५ हजार रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी नियोजित आहेत. शासनाचा निर्णय स्तुत्य असून गोरगरिबांना विजेच्या प्रश्न सुद्धा सुटल्यागत आहे. तेव्हा निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना केली आहे.
निवेदन देतेवेळी, युवक काँग्रेसचे महासचिव तथा माजी उपसरपंच स्वप्निल खंडाईत कवलेवाडा, सामाजिक कार्यकर्ते बबलू पठाण, चंद्रकुमार खंडाईत, राजकुमार खंडाईत, अनीत खंडाईत आदी उपस्थित होते.
0 Response to "घरकुल लाभार्थ्यांचे वाढीव ५० हजाराचे अनुदान लाभार्थ्यांना द्या "
एक टिप्पणी भेजें