-->
विशेष लेख.

विशेष लेख.

                 लोकनेते स्व.गणपतराव देशमुख 

हिवाळी अधिवेशनाच्या नजरेतून.

११ वेळा आमदार…पण हृदयातून “ जनतेचा माणूस “- स्व लोकनेते गणपतराव देशमुख.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ता, पक्ष, राजकीय समीकरणे, सुविधा आणि तामझाम यांची गर्दी दिसते. चमचमत्या गाड्या, सुरक्षा तुकड्या, मोठे तळ टाकलेले कॅम्प… या सर्वांमध्ये एका व्यक्तिमत्त्वाची उणीव प्रकर्षाने जाणवते—स्व. गणपतराव देशमुख, साधेपणाने लोकसेवा करण्याची शिकवण देणारे महाराष्ट्रातील खरे लोकनायक.

अधिवेशनात सत्तेचे आवाज मोठे असतात; पण देशमुख साहेब म्हणजे सत्तेपेक्षा मूल्यांचा आवाज. आज ते आपल्या सोबत नसले तरी त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचा साधेपणा आणि त्यांनी जगलेली लोकसेवेची परंपरा अधिवेशनात उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला अंतर्मुख करते.

लक्झरी गाडी कधीच नाही… एसटीच्या तिकिटावरच प्रवास!”

सत्ता मिळाल्यावर होणारा दिखावा हा राजकारणाचा एक ‘अलिखित नियम’ झाल्यासारखे आहे. मात्र देशमुख साहेबांनी हा नियमच मोडून काढला.

ते एसटी बसनेच प्रवास करायचे
,
शासकीय गाड्यांचा तामझाम नाकारायचे,आणि जनतेच्या नजरेला भिडणाऱ्या साध्या वेशातच लोकांच्या दु:खात–सुखात स्वतः सहभागी व्हायचे.
त्यांच्यासाठी ‘आमदारपद’ हे विशेषाधिकारांचे दार नव्हते; तर जनतेची जबाबदारी स्वीकारण्याची शपथ होती.

लोकशाहीचे खरे रक्षक

लोकशाहीची जपणूक कागदोपत्री नियमांनी नव्हे, तर नेत्यांच्या आचरणाने होते—हे गणपतराव देशमुख साहेबांनी जगून दाखवले.
त्यांनी मतदारांना कधीही ‘संख्या’ मानले नाही,

सत्तेपेक्षा प्रश्नांचे प्राधान्य दिले,

आणि राजकारणात पारदर्शकता व प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान दिले.
अशा नेत्यांची आज मोठी टंचाई जाणवते. म्हणूनच आजची जनता चातक पक्षाप्रमाणे पुन्हा अशाच लोकनायकांच्या शोधात आहे.

११ वेळा सलग निवडून येण्यामागे ‘कार्य’, नव्हे ‘प्रचार’

सांगोला मतदारसंघातून सलग ११ वेळा आमदार—ही केवळ एक आकडा नाही;
ही त्यांच्या कामाची पावती,
त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची मान्यता,
आणि त्यांच्या जनतेशी असलेल्या नात्याची ताकद आहे.
आजच्या काळात प्रचारयंत्रणा, सोशल मीडिया, चमकदार आश्वासने यांचा काळ आहे;
पण देशमुख साहेबांचा काळ ‘काम बोलते’ या तत्त्वाचा होता—आणि आजही तोच आदर्श ठरतो.

.                          लेखक
  प्रा.राहुल डोंगरे पारस निवास तुमसर ९४२३४१३८२६

आजच्या नेत्यांना आदर्श दाखवणारे नेतृत्व!...

हिवाळी अधिवेशनात जेव्हा मंत्र्यांचे, नेत्यांचे, आमदारांचे काफिले धावताना दिसतात, तेव्हा एक प्रश्न नजरेसमोर येतो—
सत्ता अधिक महत्त्वाची, की लोकसेवा?
आणि त्याच वेळी आठवण होते त्या व्यक्तिमत्त्वाची, जो पदावरून नव्हे, तर खोलवरच्या समर्पणातून मोठा झाला,
साधेपणातून तेजस्वी ठरला,आणि आपल्या वागण्यानेच नेतृत्वाला चारित्र्य दिले.
त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव—गणपतराव देशमुख.

 जनतेच्या हृदयात अजरामर

३० जुलै २०२१ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनी जपलेली मूल्ये, त्यांनी दिलेली लोकसेवेची शिकवण आजही जिवंत आहे.
त्यांचे जीवन हे सांगते—
नेतृत्व गाडी, सुरक्षा, स्टाफ यात नसते;
नेतृत्व जनतेच्या मनात जगण्यात असते.

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अंतर्मुख करणारी जाणीव

उपराजधानीत चाललेल्या चर्चांमध्ये, ठरावांमध्ये, घोषणांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की—जर आज देशमुख साहेबांसारखे नेते असते,तर मूल्याधारित राजकारणाची उभी परंपरा अजूनही प्रखरपणे जपली गेली असती.
अधिवेशनातील गोंगाटात त्यांचा शांत, संयमी, सत्यनिष्ठ आवाज जरी ऐकू येत नसला तरी,त्यांचे कार्य आजही प्रत्येक लोकप्रतिनिधीला मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे.

        संकलन                      संग्रहक 
   संजीव भाबोंरे.         हर्षवर्धन देशभ्रतार 

0 Response to "विशेष लेख."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article