लाखांदूर येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबरला धम्म संमेलनाचे आयोजन.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदूर :- लाखांदूर येथे बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती च्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबर 2025 रोज शुक्रवारला सकाळी ७ वाजता धम्म रॅलीचे आयोजन त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथून सुरू करण्यात येईल. कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शी सम्राट अशोक परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण पिंपळगाव रोड लाखांदूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमानिमित्त बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत विनाचार्य ,लोब सांग तेनपा, भंते चित्त ज्योती स्थवीर,भदंत महामोगलायन थेरोसावंगी ,भंते शीलभद्र चीचाळ, भदंत चारुदत्त ओपारा , भदंत कुणाल कीर्ती, यांचे नेतृत्वात धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.अशोक वानखेडे वरिष्ठ पत्रकार दिल्ली करतील. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुषमाताई अंधारे सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत मुंबई राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून अमन कांबळे संपादक आवाज इंडिया नागपूर उपस्थित राहतील. मुख्य मार्गदर्शक म्हणून शेख सुभान अली शिवचरित्र अभ्यासक छत्रपती संभाजीनगर उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून अँड शैलेश नारनवरे कायदे सल्लागार महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नागपूर , विशेष अतिथी म्हणून अँड स्मिताताई कांबळे नागपूर उपस्थित राहतील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत . सायंकाळी ७ वाजता संगीतमय प्रबोधन फैजानभाई ताज सुप्रसिद्ध भीम कव्वाल नागपूर कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटन दिनेश वासनिक उद्योजक सोनी यांचे हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. दिवेश कांबळे प्राचार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी उपस्थित राहतील. उपाध्यक्ष अनिल दहिवले उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव, परमानंद मेश्राम सामाजिक कार्यकर्ता भंडारा उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या लाभ आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष मनोज बनसोड यांनी केलेले आहे.
0 Response to "लाखांदूर येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबरला धम्म संमेलनाचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें