महापरिनिर्वाण दिन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण–संविधान व विचारांची प्रेरणा : प्राचार्य राहुल डोंगरे.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
• शारदा विद्यालय तुमसर येथे डफ वाजवून भीमगितद्वारे अभिवादन!..
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर तुमसर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंखड भावनेतून “भीमगीतांद्वारे अभिवादन” या भव्य व अभिव्यक्तिपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भव्य सादरीकरणांनी कार्यक्रम उजळून टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयंक अतकरी यांनी प्रभावीपणे पार पाडले. भाषण सादर करणाऱ्यांमध्ये विधी गभने, स्वरा पडोळे, अंतिका कुंजेकर, पंखुळी बोपचे, रितीका मेश्राम, पूर्वा भोयर, अवनी गोंडाने, मिष्टी मेश्राम, विपशी बागडे, माही मेश्राम, आरोही रोडके व रिहान देशभ्रतार या विद्यार्थिनींचा सहभाग उल्लेखनीय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेत जयश भोंगाडे यांनी साकारलेली भूमिका विशेष दाद मिळवणारी ठरली.
गीत सादरीकरणात सरस बागडे, मयंक अतकरी, कृष्णा पोटभरे, प्रथमेश मने, लक्ष मलेवार, उत्कर्ष कांबळे, पियूष रहांगडाले तसेच पंखुळी बोपचे, दिगिशा राणे, मानस गजभिये, प्राजक्ता कोकुडे, श्रावी गजभिये व चांदणी कांबळे यांनी उत्कट भावना आणि सामंजस्याने गायन सादर केले. शायरीच्या माध्यमातून सरस बागडे आणि प्रथमेश मने यांनी महापरिनिर्वाण दिनाचे सार विद्यार्थ्यांसमोर जिवंत केले.
नाटक सादर करणारे विद्यार्थ्यांनी—सृष्टी धावडे, मयंक अतकरी, हर्षल गौपाले, खणक लाडसे, राशी साठवणे, श्रद्धा पटले आणि वांशिका बिसेन—यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमास अध्यक्षस्थानी प्राचार्य राहुल डोंगरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक दिपक गडपायले आणि छत्रपती फाउंडेशनचे गायक प्रकाश चव्हाण उपस्थित होते. प्रकाश चव्हाण यांनी डफच्या साथीने कविवर्य वामनदादा कर्डकांची स्फूर्तीदायी गीते सादर करून विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण केली.
प्राचार्य राहुल डोंगरे अध्यक्ष स्थानावरून म्हणाले, “महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि विचारांची नवचेतना देणारा दिवस आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान आजही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक आहे.महापरिनिर्वाणदिन म्हणजे शिक्षण- संविधान व विचारांचीप्रेरणा आहे.”
या कार्यक्रमाच्या यशात ज्योती बालपांडे, श्रीराम शेंडे, संजय बावणकर, नितुवर्षा मुकुरणे, विद्या मस्के, प्रीती भोयर, अशोक खंगार, सारिका आठोडे-भोयर, अंकलेश तिजारे, सूकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, बेनिता रंगारी, नेहा बारई, नारायण मोहनकर, दिपक बालपांडे, झांकेश्वरी सोनवने, विद्या देशमुख, बंदिनी, मानकर बाई व दातेबाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणी “जय भीम – शिक्षण हीच शक्ती” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात उजळून राहिला.
0 Response to "महापरिनिर्वाण दिन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण–संविधान व विचारांची प्रेरणा : प्राचार्य राहुल डोंगरे."
एक टिप्पणी भेजें