सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संघ भंडारा धडकला मोर्चा विधिमंडळावर
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संघ भंडाराच्या वतीने विविध मागण्यांसाठी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तो मॉरिस कॉलेज टी-पॉइंट येथे अडविला. मोर्चात सहभागी विविध सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. मोर्चातील शिष्टमंडळाने मंत्रि महोदयांना निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व संजय मते, राकेश मलेवार, श्रीकांत लांजेवार, भूपेंद्र मिश्रा,राहुल शामकुमार, विजय दुबे, मनिषा भांडारकर, माजी शिक्षणाधिकारी के झेड शेंडे, आनंद बिसने, संजय वाघमारे, रामटेके साहेब, लोकेश तिरपुडे, संजय समरित, संजय तलमले, अरविंद सेलोकर, यांनी केले
देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये विनानिविदा काम वाटपाची मर्यादा 10 लाख करण्यात आली असून, ही काम वाटप समितीमार्फतच वाटप करावी.
सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना बांधकामाची कामे व बहाल करून सार्वजनिक बांधकाम विभागात नोंदणी करण्यात आले आहे. परंतु कामाची टक्केवारी ठरविल्याने २५ टक्केवारी निश्चित करून न्याय द्यावा.
सर्व शासकीय कार्यालयांत विविध प्रकारची कामे सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थांना देण्यात यावी.
0 Response to "सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संघ भंडारा धडकला मोर्चा विधिमंडळावर"
एक टिप्पणी भेजें