तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज -प्रकाश सोनवणे.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- सध्याच्या काळात तरुण पिढी ही व्यसनामध्ये अधिक अडकत चालली आहे. पैसे कमावण्याचे सोपे उपाय शोधत आहे . महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात उच्च पदाधिकारी आहेत .मोठे उद्योजक आहेत. त्यांनी आताच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. व्यसनापासून दूर ठेवण्याची नितांत गरज आहे.परंतु ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत चुनाव दरम्यान मतदारांना दारूचे लालच दाखवून मतदारांना व्यसनाधीन करतात. त्यामुळे तो व्यक्ती सुद्धा व्यसनाधीनाच्या आहारी जाऊ शकतो. व्यसनाधीनतामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात. उघड्यावर पडतात. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकत नाही. व दारूवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. त्याचप्रमाणे जोपर्यंत कुठलाही व्यक्ती आपल्या स्वतःच्या पायावर उभा होत नाही तोपर्यंत त्यांनी आपल्याला राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजची तरुण मंडळी कितीही शिकली सवरली तरी त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावीच लागते. त्या त्याशिवाय त्यांचे भविष्याचे करिअर घडत नसते. यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. पुणे ,संभाजीनगर , मुंबई येथे 12 वी नंतर काम करत असलेल्या मुलांना काम करत असताना व्यावसायिक शिक्षण कसे घ्यायचे याकरिता शासन स्तरावर गावागावात मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत ब्ल्यू स्टार टीव्ही न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक प्रकाश बळीराम सोनवणे यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना सांगितले .
0 Response to "तरुण पिढीला मार्गदर्शनाची गरज -प्रकाश सोनवणे."
एक टिप्पणी भेजें