आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांगांच्या मोर्चा !..
शुक्रवार, 12 दिसंबर 2025
Comment
• चलो जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.
" उठ दिव्यांग जागा हो आंदोलनाचा धागा हो ,,
अभी नहीं तो कभी नहीं
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- जिल्हा तालुका, शहरं, गाव ,पाड्यातील , सर्व दिव्यांगांना विनंती आहे .,,
येत्या दिनांक १२/१२/२०२५ वार शुक्रवारी स.११ वा
ठिकाण - कलेक्टर कंम्पाउंट जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
येथे .दिव्यांग बांधवांनाचा मोर्चा काढण्यात येत आहे.तरी निवेदन देण्यासाठी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,,
प्रमुख मागण्या...
(आंदोलनाचे मुद्दे):
१) शासन निर्णयानुसार आमदार-खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा.
२) शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी असलेल्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी व आमदार यांच्या अध्यक्षेतखाली असलेल्या जिल्हा व तालुका समित्या तात्काळ स्थापन कराव्या.
३) सर्व दिव्यांगांना एकसमान ₹२५०० मासिक पेन्शन लागू करावी.
४) जिल्हा नियोजन निधीतील १% रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वापरावी.
५) भूमिहीन बेघर दिव्यागांना राहण्यासाठी 1 गुठ्ठा जागा द्यावी.
६) तहसिलदार व धान्य वितरण कार्यालयातील कर्मचारी वर्गा कडुन दिव्यांगांनची दिशाभुल करुंन रेशनकार्ड , धान्य, व आरसी नंबर च्या कामांना विलंब करणे
या आंदोलनाला मोठ्या संख्येने दिव्यांगांची उपस्थिती महत्वाची आहे कारण आज आपण आपल्या हक्कासाठी एकजुटीने उभे नाही राहीलो तर तर येत्या काळात दिव्यांगाच्या समस्या जास्त प्रमाणात वाढलेला दिसुन येईल कृपया आपण आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी तरी या आंदोलनात सहभागी व्हावे!..
यावेळी निवेदन देतांना प्रहार जिल्हाध्यक्ष मा.पंढरीनाथ हुंडेकर,प्रहार जिल्हा सचिव मा.शिवलिंग माटोरे ,प्रहार मा.प्रमुख अनिल शेटे पा.,प्रहार तलुका अध्यक्ष माधव पांचाळ मुदखेड,प्रहार ता.सचिव साहेबं निवडंगे,प्रहार ता.उपाध्यक्ष नवनाथ क्षिरसागर नांदेड.यांनी
सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
दिव्यांग एकजुटीचा विजय असो
0 Response to " आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांगांच्या मोर्चा !.."
एक टिप्पणी भेजें