नांदेड जिल्हाधिकारी यांना दिव्यांग संघटना द्वारे निवेदन.
शुक्रवार, 12 दिसंबर 2025
Comment
•दिव्यांगांचे विविध मागण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी यांना प्रमुख मागण्याची दिले निवेदन.
•"प्रहार संघटना" व "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटने" च्या पुढाकार.
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- नांदेड जिल्हा तालुका, शहरं, गाव ,पाड्यातील , सर्व दिव्यांगांनी व त्यांच्या विविध संघटनांनी
दिनांक ११/१२/२०२५
गुरुवारला कलेक्टर कंम्पाउंट जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन प्रमुख मागण्या निवेदन दिले.
अशा आहेत त्या प्रमुख मागण्या.
१) शासन निर्णयानुसार आमदार-खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा.
२) शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी असलेल्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी व आमदार यांच्या अध्यक्षेतखाली असलेल्या जिल्हा व तालुका समित्या तात्काळ स्थापन कराव्या.
३) सर्व दिव्यांगांना एकसमान ₹२५०० मासिक पेन्शन लागू करावी.
४) जिल्हा नियोजन निधीतील १% रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वापरावी.
५) भूमिहीन बेघर दिव्यागांना राहण्यासाठी 1 गुठ्ठा जागा द्यावी.
६) तहसिलदार व धान्य वितरण कार्यालयातील कर्मचारी वर्गा कडुन दिव्यांगांनची दिशाभुल करुंन रेशनकार्ड , धान्य, व आरसी नंबर च्या कामांना विलंब करणे.
यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी व "अखिल भारतीय ध्रुवताला अपंग क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी" तसेच "प्रहार संघटनेचे" जिल्हाध्यक्ष मा.पंढरीनाथ हुंडेकर,प्रहार जिल्हा सचिव मा.शिवलिंग माटोरे ,प्रहार मा.प्रमुख अनिल शेटे पा.,प्रहार तलुका अध्यक्ष माधव पांचाळ मुदखेड,प्रहार ता.सचिव साहेबं निवडंगे,प्रहार ता.उपाध्यक्ष नवनाथ क्षिरसागर नांदेड.निवेदन देतेवेळी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्यांग एकजुटीचा विजय असो!..
0 Response to "नांदेड जिल्हाधिकारी यांना दिव्यांग संघटना द्वारे निवेदन."
एक टिप्पणी भेजें