अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोलीतच कायम ठेवण्याची मागणी – तीनही आमदार एकत्र.
गुरुवार, 11 दिसंबर 2025
Comment
. गडचिरोली जिल्हायातील तिन्ही आमदार
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
गडचिरोली :- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय गडचिरोली येथून किनवट येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव समोर आला असताना, गडचिरोली जिल्ह्यातील तीनही आमदारांनी एकत्र येत हा निर्णय रद्द करून समिती गडचिरोलीतच कायम ठेवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधी सूचना देण्याबरोबरच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याबाबतही आज विधिमंडळ परिसरात सविस्तर चर्चा करण्यात आली.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम, तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे यांनी एकत्रितपणे ही भूमिका मांडली. समिती गडचिरोलीत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी मोठा दिलासा मिळतो. कार्यालय किनवट येथे हलवल्यास नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागेल आणि त्यातून अनावश्यक अडचणी निर्माण होतील, अशी भूमिका तिन्ही आमदारांनी स्पष्ट केली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे तातडीने निवेदन देऊन सदर कार्यालय गडचिरोलीतच कायम ठेवण्याचा ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती या चर्चेत देण्यात आली.
0 Response to "अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोलीतच कायम ठेवण्याची मागणी – तीनही आमदार एकत्र."
एक टिप्पणी भेजें