-->
संविधान हाच मानवाधिकाराचा पाया- न्या. आर. पी. बाठे.

संविधान हाच मानवाधिकाराचा पाया- न्या. आर. पी. बाठे.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- भारतीय संविधान हा भारतातील मानवाधिकाराचा मुख्य पाया असून संविधानिक मूल्यांचे संवर्धन करणे सर्वांचे कर्तव्य आहे' असे प्रतिपादन न्या. श्री आर पी बाठे (अध्यक्ष, तालुका विधि सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तुमसर) यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालयात नुकतेच कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. महाविद्यालयातील मराठी विभाग, महिला कक्ष व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तुमसर न्यायालयातील न्यायाधीश श्री आर. पी. बाठे हे उपस्थित होते.

या शिबिरामध्ये 'मानवाधिकार' या विषयावर श्री बाठे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. तर अड. विलास माटे (अध्यक्ष, तालुका वकील संघ, तुमसर) यांनी 'पोक्सो' कायद्यासंदर्भात तर ऍड. नेहार मेहर यांनी 'नागरिकांची मूलभूत कर्तव्ये' या विषयावर मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ राहुल भगत म्हणाले की, कायदेविषयक सतर्कता आजच्या पिढीची गरज बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायद्याचा अभ्यास करावा. तसेच मानवाधिकार व सामाजिक न्यायाबाबत प्रत्येक नागरिकांनी जागरूक असावे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ रेणुकादास उबाळे यांनी केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजेंद्र बेलोकार यांनी आभार प्रदर्शन केले. या शिबिराला महाविद्यालयातील महिला कक्षाच्या समन्वयक डॉ भारती काटेखाये, डॉ सुनिता राठोड, डॉ राजेश दिपटे, डॉ जयंतकुमार मस्के, डॉ जगन्नाथ गडपायले, डॉ गोल्डी बघमार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "संविधान हाच मानवाधिकाराचा पाया- न्या. आर. पी. बाठे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article