" संत जगनाडे महाराज यांचे विचार आजच्या युवकांसाठी दीपस्तंभ ” – इंजि. अश्विन बडवाईक.
बुधवार, 10 दिसंबर 2025
Comment
• शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- स्थानिक पूजा शिक्षण संस्थेद्वारा संचालित शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर तुमसर येथे संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांची जयंती विविध सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राहूल डोंगरे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा वक्ते इंजि. अश्विन बडवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्वी नवखरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली. यामध्ये लिझा हेडाऊ, किंजल मुकुर्णे, आकांक्षा कुथे, माही रामटेके, भावेश लांजेवार, शैलेश गभने, प्रलय साठवणे व हितेश मलेवार यांचा सहभाग होता. राम बोपचे यांनी सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमात उत्साह निर्माण केला, तर आरुषी गाढवे, खुशबू गभने, वैदेही ढेंगे व पौर्णिमा लाडसे यांनी सादर केलेल्या अभंगांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सृष्टी धावडे यांनी केले.
प्रमुख वक्ते इंजि. अश्विन बडवाईक यांनी संत जगनाडे महाराजांचे जीवन हे केवळ धार्मिक प्रेरणापुरते मर्यादित नसून समता, श्रम, सातत्य व मूल्यनिष्ठ जीवनाचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. “मनुष्य जन्मामुळे मोठा होत नाही, तर कर्मामुळे मोठा होतो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने परिश्रम करण्याचे आवाहन केले. संत जगनाडे महाराजांनी हजारो अभंगांची रचना करून समाजातील अज्ञान, भेदभाव व अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी भक्ती, सत्य, कर्तव्य आणि समाजसेवेची मूल्ये लोकांमध्ये रुजवली.ते आजच्या युवकांसाठी दीपस्तंभ आहेत,असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य राहूल डोंगरे यांनी संत जगनाडे महाराजांनी शिक्षण, ज्ञान व समतेला मुक्तीचा मार्ग मानले असल्याचे सांगितले. अंधश्रद्धेवर प्रहार करून विवेकशील विचारांची ज्योत त्यांनी समाजात प्रज्वलित केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांवर चालत सद्गुण, विज्ञाननिष्ठा व समाजसेवा अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती बालपांडे, दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, नितुवर्षा मुकुर्णे, विद्या मस्के, प्रीती भोयर, अशोक खंगार, सारिका भोयर, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, अंकलेश तिजारे, नेहा बारई, बेनिता रंगारी, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर, झनकेश्वरी सोनवणे, विद्या देशमुख, मानकरबाई, दातेबाई, बंदिनी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "" संत जगनाडे महाराज यांचे विचार आजच्या युवकांसाठी दीपस्तंभ ” – इंजि. अश्विन बडवाईक."
एक टिप्पणी भेजें