-->
दुय्यम निबंधकाचे वरदहस्ताने अतिरिक्त दराने मुद्रांक विक्री

दुय्यम निबंधकाचे वरदहस्ताने अतिरिक्त दराने मुद्रांक विक्री



• लाखनी येथील प्रकार 

• दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

लाखनी :- येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिनस्त मुद्रांक विक्रेत्यांकडून तालुक्यातील जनतेला शासकीय अथवा खाजगी कामासाठी १० टक्के अधिक दराने मुद्रांक तथा कोर्ट स्टॅम्प ची विक्री केली जाते. या बाबद दुय्यम निबंधकास माहिती असताना सुद्धा बघ्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे दुय्यम निबंधकाचे आशिर्वादाने तर असला प्रकार होत नाही ना ? असा संभ्रम निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष पुरवून अतिरिक्त दराने मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्प विक्री चा गोरखधंदा बंद करणे आवश्यक झाले आहे. 
          साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून १९९९ मध्ये लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. पण दुय्यम निबंधक कार्यालये सुरू केले गेले नसल्यामुळे शेतजमीन खरेदी विक्री, शेती व घराचे मूल्यांकन व शेतीविषयक अनेक दस्त तयार करण्यासाठी साकोली येथे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागून वेळ आणि पैशाचाही अपव्यय होत होता. लाखनी तालुक्यातील जनतेच्या मागणीवरून तत्कालीन खासदार व आमदाराचे प्रयत्नाने २००७ मध्ये लाखनी येथे भाड्याचे घरात दुय्यम निबंधक कार्यालयास सुरुवात करण्यात आली. तालुक्यात ४ मुद्रांक विक्रेते होते त्या पैकी काहींना परवडेनासे न झाल्याने मुद्रांक विक्री बंद केली. सध्या दोनच मुद्रांक विक्रेते आहेत. या मुद्रांक विक्रेत्यांना शासनाचे वतीने उपकोषागार कार्यालयामार्फत मुद्रांक आणि कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध करण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीत मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्प विक्री करण्याचे बंधन असले तरी दुय्यम निबंधकाचे आशीर्वादाने मुद्रांक विक्रेत्यांकडून १०० रुपयाचे स्टॅम्प वर १० रुपये अतिरिक्त घेऊन तसेच १० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प वर २ रुपये अतिरिक्त घेऊन लगत च्या एका झेरॉक्स मधून विक्री केली जाते. या प्रकाराने शेतकऱ्यांसह जनतेची आर्थिक लूट होत आहे. या बाबद दुय्यम निबंधकास माहिती असताना सुद्धा याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याने दुय्यम निबंधकाचे छत्रछायेत तर हा गोरखधंदा सुरू नाही ना ? असा संभ्रम निर्माण होतो. त्या झेरॉक्स वाल्याकडे कोर्ट फी स्टॅम्प कोण उपलब्ध करतो. हा संशोधनाचा विषय झाला आहे. या गंभीर बाबीकडे तहसीलदार लाखनी, उपकोषागार अधिकारी लाखनी व उपजिल्हाधिकारी मुद्रांक शुल्क यांनी स्वतः लक्ष घालून अतिरिक्त रक्कम घेऊन मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्प विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. तथा मागील अनेक दिवसापासून सुरू असलेल्या ह्या गोरखधंद्यांवर लगाम लावणे आवश्यक झाले आहे.

0 Response to "दुय्यम निबंधकाचे वरदहस्ताने अतिरिक्त दराने मुद्रांक विक्री"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article