-->
अन् थोडक्यात बचावले महिला पोलीस अधिकारी.

अन् थोडक्यात बचावले महिला पोलीस अधिकारी.



• दोन महिला पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी.

 भंडारा :- लाखनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) वरील मानेगाव/सडक फाट्याजवळ

मंगळवार ता. ९ डिसेंबर दुपारी १२: ३० वाजे भरधाव ट्रकने छत्तीसगड पोलिसांच्या स्कॉर्पिओला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात छत्तीसगडच्या डोगरगढ पोलीस ठाण्यातील दोन महिला पोलीस उपनिरीक्षक व चालक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. डोंगरगढ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी रामनारायण बघेल (४१), त्यांच्या सहकारी रोजलिन सामियल (४०) आणि स्कॉर्पिओ चालक तोमेश महावीर साहू (वय २५, रा. डोंगरगाव) हे तिघे पोलीस कर्मचारी एका गंभीर गुन्ह्याच्या पोक्सो कायद्यांतर्गत तपासासाठी त्यांची स्कॉर्पिओ क्र. सिजी ०८ बीबी १५१० घेऊन नागपूर येथील मेयो रुग्णालयाकडे निघाले होते. दरम्यान, मानेगाव-सडक येथील श्चपी पेट्रोलपंप जवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्र. सिजी ०८ एवाय ७७०७ ट्रक चालकाने अत्यंत बेदरकारपणे ओव्हरटेक करताना स्कॉर्पिओला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, स्कॉर्पिओ रस्त्यावर पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली, अपघातानंतर तत्काळ स्थानिकांच्या मदतीने जखमीना लाखनी येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही महिला पोलीस उपनिरीक्षक आणि चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावर गोधळ निर्माण होऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेनंतर ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळ सोडून पसार झाला. जखमी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी बघेल यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलीस ठाण्यात पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध कलम २८१, १२५ अ. १२५ ब भारतीय न्याय संहिता २०२३, मोटरवाहन कायदा सहकलम १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नायक राजेश बांते या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

0 Response to "अन् थोडक्यात बचावले महिला पोलीस अधिकारी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article