-->
बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अटक वॉरंट.

बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अटक वॉरंट.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा :- सत्र न्यायालयाने आमदार निवास परिसरातील हिंसक आंदोलनाच्या प्रकरणामध्ये राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करून त्यांना गुरुवारी (दि. ११) न्यायालयात हजर करावे, असे निर्देश सीताबर्डी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.

या प्रकरणावर न्यायाधीश मोहतेसीम बदर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी २०१८ मध्ये खोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार निवास परिसरात हिंसक आंदोलन केले होते. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी कडू यांच्यासह दहा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३५३, १४३, १४७, १४९, ३०८, ३३६ व ४२७ अंतर्गत एफआयआर नोंदवला व प्रकरणाच्या तपासानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला. त्या खटल्यावरील सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे कडू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल.

0 Response to "बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अटक वॉरंट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article