ग्यास सिलेंडरच्या तुटवड्याने ग्रामीण भागात हाहाकार शासन प्रशासन निद्रेत.
शनिवार, 13 दिसंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्ह्यात ग्यास सिलेंडर चा तुटवडा येत असल्याचे सांगून ग्यास गोडाऊन वर आता शहरी भागातील लोकांच्या रांगा वाढल्या असून ग्रामीण भागात ग्यास सिलेंडर पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित करण्यात आला आहे. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात ब्लॅक सिलेंडर विक्री, करून सर्व ग्रामीण भागात ग्यास पुरवठा करणे बंद करण्यात आले आहे.
शासनाचे खाजगी ऑनलाईन कम्पन्यांच्या आर्थिक लाभासाठी भिजत घोंगड
सध्या शासन डिजिटल कम्पण्यांच्या आर्थिक लाभासाठी नेहमी प्रमाणे दमछाक करत असून ग्रामीण जनतेला के. वाय. सी. आणि ऑनलाईन च्या कामाने वारंवार आर्थिक लूट करून योजना खंडित करत आहे शासनाच्या विविध योजनाणसाठी ग्रामीण भागातील जनतेचा आधारकार्ड आधीच ऑनलाईन करण्यात आले असले तरी पुन्हा पुन्हा आधार कार्ड, बँक अकाउंट ऑनलाईन करण्यात आले असले तरीही नाहक ग्रामीण जनतेला रोजगार सोडून ऑनलाईन कामात खर्च करावा लागत आहे. सध्या शहरी व ग्रामीण भागातील जनतेला ग्यास सिलेंडर मिळत नसल्याने स्वयंपाक कस करायचं म्हणून उपासमारीची वेळ आली आहे.
अधिवेशन काळात राजकीय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष
विदर्भाचा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असतांना एकही पुढारी या मूलभूत गरजे कडे लक्ष घालत नसल्याचे दिसून येत आहे. स्वतः
राजकीय पुढारी स्वत:ची पोळी शेकण्यात खुश असून सत्ताधारी किंव्हा विरोधी पक्ष नेते जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. बरेच गरीब लोक शेत शिवारात काळ्या फाट्या जमा करत असल्याचे दिसून येते. अन्न शिजविण्यासाठी इंधन म्हणून ग्यास सिलेंडर हेच एकमेव साधन असून गरीब अज्ञानी जनतेला ब्ल्याक मध्ये ग्यास घेणे अवघड होत आहे.
ग्यास सिलेंडर चा काळा बाजरीकरण शासन प्रशासन निद्रेत
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. ते साडे नवशेचा सिलेंडर तेराशे रुपयांना खरेदी करून काला बाजरीकरणाला प्रोत्साहन देत आहेत काही ग्यास सिलेंडर पुरवठा परवाना धारकांच्या गाड्या अनाधिकृत पुरवठा दारांना ब्ल्याक मध्ये सिलेंडर विक्री करत असून ते इतर सीएनजी धारक वाहन चालकांना 1500/- किमतीने सिलेंडर विक्री केले जातं असल्याचे बोलले जात आहे.मात्र जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा अधिकारी या कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे या ग्यास सिलेंडर काळा बाजरीकरण विरोधात कोणी लक्ष घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Response to "ग्यास सिलेंडरच्या तुटवड्याने ग्रामीण भागात हाहाकार शासन प्रशासन निद्रेत."
एक टिप्पणी भेजें