-->
प्रशासन झोपेत की दबावात?.. भूगाव रेती घाटावरून अवैध उत्खननाला उघड पाठबळ ?..

प्रशासन झोपेत की दबावात?.. भूगाव रेती घाटावरून अवैध उत्खननाला उघड पाठबळ ?..

.       भूगांव घाटातील रेती ची लुट करतांना तस्कर 


• भूगाव रेती घाटावर तस्करांकडून बेसुमार लुट !.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील भूगाव घाट परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली अवैध रेती तस्करी दिवसेंदिवस बळावत चालली आहे.सर्व काही भरदिवसा,सर्वांच्या नजरेसमोर, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महसूलच्या चौकी समोरुन व भूगाव येथील महसूल अधिकारी यांचे कार्यालयासमोरून रेतीने भरलेले ट्रॅक्टर सर्रास धावताना दिसतात.आश्चर्य म्हणजे,हा तमाशा माहित असूनही संबंधित विभाग मात्र कारवाईतुन हात झटकताना दिसत आहेत. त्यामुळे भूगाव गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून प्रशासनाचा भोंगळपणा आणि भूमिकेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मागील काळात याच रेती घाटावरून तस्कराकडून मोठ्या प्रमाणात रेती उपसा झालेला आहे.पुन्हा तीच परिस्थिती असून रात्रीच नाही तर आता भरदिवसाही अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे.गावकरी सांगतात की,राजकीय दबावापोटी काही मोजक्या व्यक्तींना खुली मुभा मिळाल्यामुळे तस्करांचे धाडस प्रचंड वाढले आहे.परिणामी, सरकारी महसुलाचे लाखो रुपये बुडत असून पर्यावरणाचेही प्रचंड नुकसान होत असल्याची माहिती आहे.प्रशासनाकडे सर्व माहिती असूनही कारवाई होत नसल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.

तहसील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.पोलीस विभागाच्या भूमिकेवरसुद्धा नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.'दररोज आमच्या गावातून २५ ते ३० वाहने जातात,पण प्रशासनाला दिसत नाही का?'असा रोष ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.त्यामुळे प्रशासनाची अनाकलनीय शांतता संशयास्पद ठरत आहे.

 प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष केले तर भूगाव घाटातून होणारी तस्करी एका दिवसात थांबली असती.मात्र सततच्या टाळाटाळीमुळे तस्करांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत असून ते उघड उघड दहशत माजवत आहेत.या अनियंत्रित तस्करीमुळे.भूगाव येथील नदीकाठ धोकादायकरीत्या खचत असून पाण्याच्या प्रवाहात बदल होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या,फोटो-व्हिडिओ पुरावे दिले,पण कारवाई शून्य.त्यामुळे 'प्रशासन झोपले आहे की कोणाच्या दबावाखाली आहे?' असा प्रश्न आता गावकरी विचारत आहे.वरिष्ठांनी याची चौकशी करून त्वरित रेती तस्करीला आळा घालावा,अशी मागणी जोर धरत आहे.अशीच परिस्थिती लागून असलेल्या विहीरगाव व पळसगाव रेती घाटाची सुद्धा आहे.

0 Response to "प्रशासन झोपेत की दबावात?.. भूगाव रेती घाटावरून अवैध उत्खननाला उघड पाठबळ ?.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article