झरी तलावातील पाणी झरीतील शेतीलाच द्या अन्यथा जलसमाधी.
मंगलवार, 2 दिसंबर 2025
Comment
• झरी गावातील शेतकऱ्यांचा इशारा.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील झरी येथील तलाव हा 125 ते 150 एकर जागेत विस्तारित आहे. सदर तलावाची जागा ही झरीतील शेतकऱ्यांची असून पाण्याविना शेती मरू नये. म्हणून मोठया परिश्रमाने हा तलाव निर्माण केला. व याच तलावातून पाणी काढून रब्बी व खरीप हंगाम झरी गावातील शेतकरी कित्येक वर्षांपासून शेतीतून उत्पादन काढत होते. मात्र 2004 पासून काही संधीसाधू लोकांनी पाणी वाटप समिती स्थापन करून या तलावातील पाणी मुर्झा पारडी रयतवाडी येथील शेतातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव पाणी पुरवठा समितीकडे मांडला. व तो अमलात आणून तेव्हापासून मुर्झा, पारडी व रयतवाडी येथील शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामासाठी देत होते. त्यामुळे झरी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला बरोबर पाणी मिळत नाही. सदर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देणे म्हणजे हा झरी गावातील शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोप ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केला आहे. पाणी पुरवठा समितीने रो्टेशन पद्धत लागू केल्यापासून झरीतील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांवर संकट ओढवलेले आहे. या बाबद वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही लघु पाटबंधारे विभाग भंडारा तसेच लोकप्रतिनिधी कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून न्याय मिळविण्यासाठी झरी येथील शेतकऱ्यांनी आता थेट सामूहिक जलसंमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. आमचाच तलाव आमचं पाणी आणि आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आह्मालाच जीव द्यावे लागत असेल तर उभारलेला लढा मागे घेणार नाही.अशी भूमिका ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे.झरी येथील संपूर्ण शेतकरी व ग्रामस्थ शांतता पद्धतीने आंदोलन करून पाणी पुरवठा समितीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांच्या या आंदोलनाच्या ईशाऱ्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
0 Response to "झरी तलावातील पाणी झरीतील शेतीलाच द्या अन्यथा जलसमाधी."
एक टिप्पणी भेजें