-->
जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न.

जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न.



नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- भंडारा जिल्हा परिषदमधून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिनांक 12 डिसेंबर 2025 ला घेण्यात आला व गटवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात अखिल भारतीय सभागृह गणेशपूर भंडारा येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात कोणीही अध्यक्ष ,सचिव नाही तर कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने घेण्यात येतो.हा महाराष्ट्र राज्यातील अगला वेगळा कार्यक्रम समजला जातो.या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेले वास्तव्यास कोठेही असले तरी आवर्जून उपस्थित राहतात कारण त्यांच्या डोक्यात 12 डिसेंबर ही तारीख कधीही न विसरण्यासारखी घट्ट झालेली आहे.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन शरद नखाते यांनी करावे अशी विनंती अजाबराव चिचामे यांनी केली त्याला प्रतिसाद देत नखाते यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सुरुवातीपासून आतापर्यंत सभागृहात सादर केली. उपस्थित सर्व सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांनी आपला परिचय सांगितले.वसंत नेमा, हरिभाऊ लोणारे, के. एल.झळके, शकीला शेख, बोकडे, श्रीमती डोंगरे, डॉ.संजय मानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त कर्मचारी विजय ढोमणे, कठाले यानी उत्कृष्ट गीत सादर केले. मध्यांतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला . ज्या सेवानिवृतानी वयाची ७५ वर्ष पूर्ण केली आहेत त्या कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी शाल देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भगीरथ नागलवाडे, शरद नखाते, बी.एन. टीचकुले, शालिकराम बोरकर, अजाबराव चिचामे, एन.बी. पराते , चिंधु बुधे, श्याम कुकडे,वामनराव गायकवाड,अतुल वर्मा,वसंत धाबेकर,वसंत चामट,फाल्गुन बोंद्रे, नरेश भोयर,तुळशीराम कडव,तुळशीदास कोरे यांनी अथक परिश्रम घेतले.

0 Response to "जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article