-->
उल्हासनगर 04 येथील नालंदा शाळेच्या समोरील मैदानाची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी..

उल्हासनगर 04 येथील नालंदा शाळेच्या समोरील मैदानाची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी..


सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

उल्हासनगर :- महानगर पालिका निवडणुकीच्या काळात मतदान केंद्राची साफ-सफाई करण्याच्या नावाखाली मैदानाच्या बाजूला असलेली घाण मातीची भर नालांदा शाळे समोरील मैदानात पसरवली असून ती भर नाली तुटल्यामूळे तेथे स्थानिक नागरिकांनी लावली होती जेणे करून नालीचे घाण पाणी मैदानात येऊ नये म्हणून पण शाळेच्या मुख्यध्यापक यांच्या या अजब कारभारामुळे नालंदा शाळेच्या समोरील मैदानात आता पूर्ण पाने माती ,काचेचे तुकडे, खडी, विटा टाकल्याने शाळेतील मुले तसेच आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक मुलांचे खेळणे बंद झाले असून मुलांनी यावर नाराजगी व्यक्त केली आहे तसेच नालंदा शाळेतील मुख्याध्यापिका डांगळे यांना जाब विचारून त्वरीत मैदानातील भर उचलण्यासाठी सांगीतले आहे. 

विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण , क्रीडा किंवा अन्य शालेय उपक्रमांसाठी खेळताना अडचणी येत आहेत .जमिनीचा पृष्ठभाग असमान झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पडून दुखापत होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच ॲड प्रशांत चंदनशिव यांनी त्वरित स्वच्छता निरीक्षक भोये यांना सांगून ती सर्व माती व खडी उचलण्यास विनंती केली असून ती एक दोन दिवसात पूर्ण पणे मैदान साफ करण्यात येईल असे सांगितले आहे. स्थानिक नागरिक सिद्धार्थ खडताळे, मेहुल गायकवाड, अस्मित गावंडे या ठिकाणीं उपस्थित होते.

0 Response to "उल्हासनगर 04 येथील नालंदा शाळेच्या समोरील मैदानाची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article