-->
​शासन निर्णयाच्या यादीतून संत तुकाराम महाराज गायब; कुणबी-बहुजन समाजात संताप.

​शासन निर्णयाच्या यादीतून संत तुकाराम महाराज गायब; कुणबी-बहुजन समाजात संताप.

.       संत तुकाराम महाराज शा.नि यादितुन गायप

​• तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा 'राष्ट्रीय कुणबी महासंघा'चा इशारा.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
​लाखनी :- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०२५ रोजी सन २०२६ वर्षासाठीचे राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती आणि संतांच्या जयंती व पुण्यतिथी साजरे करण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक निर्गमित केले आहे. या यादीत तब्बल ४५ थोर व्यक्तींचा समावेश करण्यात आला असला तरी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचा कळस असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव या यादीतून वगळण्यात आले आहे. शासनाच्या या कृतीमुळे कुणबी आणि ओबीसी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, ही चूक न सुधारल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
​शासनाने जाहीर केलेल्या या यादीत विविध क्षेत्रातील समाजसुधारक, देशभक्त आणि संतांचा समावेश आहे. मात्र, महाराष्ट्राच्या मातीतील सर्वात प्रभावशाली संत व्यक्तिमत्त्व असलेल्या तुकोबांचा विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. "ही बाब केवळ तांत्रिक चूक आहे की जाणीवपूर्वक केलेला अपमान?" असा संतप्त सवाल आता सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
"संत तुकाराम महाराज हे बहुजन समाजाला जागृत करणारे क्रांतीकारक संत होते. त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा आणि अयोग्य प्रथा-परंपरेवर प्रहार केले. जिवंतपणी त्यांच्या वाट्याला छळ आणि मानहानी आली, मात्र त्यांच्या निधनानंतरही शासन तेच धोरण राबवत असल्याचे दिसते. शासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन संत तुकाराम महाराजांचे नाव यादीत समाविष्ट करावे, अन्यथा राष्ट्रीय कुणबी महासंघ संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा राष्ट्रीय कुणबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे यांनी दिला आहे.
​'जन्माने छळले, मरणाने सुटका केली' तरीही उपेक्षाच?
​संत तुकाराम महाराजांच्या संदर्भात 'जन्माने छळले आणि मरणाने सुटका केली' असे म्हटले जाते. परंतु, शासनाच्या या नव्या निर्णयामुळे त्यांना निधनानंतरही शासकीय सन्मान मिळवण्यासाठी समाजाला संघर्ष करावा लागत आहे. या निर्णयाचा निषेध नोंदवत भंडारा जिल्ह्यात कुणबी समाजाने मोठी नाराजी व्यक्त केली आहे. जर शासनाने आपले धोरण बदलले नाही, तर हा मुद्दा आगामी काळात राजकीय दृष्ठ्या सरकारला किंमत मोजावी लागेल हे निश्चित.

0 Response to "​शासन निर्णयाच्या यादीतून संत तुकाराम महाराज गायब; कुणबी-बहुजन समाजात संताप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article