क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून धम्मगुरु भदंत संघरत्न मानके यांच्या वाढदिवसानिमित्त धम्म रथयात्रेचे आयोजन.
शनिवार, 3 जनवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :-- पवनी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पय्या मेत्ता संघाचे अध्यक्ष धम्मगुरु भदंत संघरत्न मानके यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आले. व त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पवनी शहरातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य धम्म रथ रॅली करण्यात आली .या रॅलीमध्ये असंख्य बौद्ध उपासक, उपासिका सामील झाले होते. सिंदपुरी येथील स्तुपामध्ये वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते मनोज बनसोड, पत्रकार लक्ष्मीकांत तागडे, एडवोकेट महेंद्र गोस्वामी, अरुण गोंडाणे माजी पंचायत समिती सदस्य, डॉ. सुनील जीवनतारे माजी सभापती पंचायत समिती पवनी, सामाजिक कार्यकर्ते आसित बागडे, कैलास गेडाम ,प्रवीण थुलकर, सुदेश वैद्य, इंजिनिअर रूपचंद रामटेके, भदंत धम्मशिखर, जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई, ज्ञानेश्वर रक्षक गुरुकंज सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी धर्मदास भांबोरे ,भीमराव वानखेडे, डॉ. बनसोड , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, इंडियन प्रफुल व असंख्य बौद्ध उपासक, उपासिका यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट महेंद्र गोस्वामी यांनी केले .तर आभार सामाजिक कार्यकर्ते मनोज बनसोड यांनी मानले.
0 Response to "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून धम्मगुरु भदंत संघरत्न मानके यांच्या वाढदिवसानिमित्त धम्म रथयात्रेचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें