सुमोची ट्रकला धडक - अपघातात १२ मजूर जखमी.
रविवार, 25 जनवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
चिमूर :- चिमूर तालुक्यातील पेठ येथील महिला मजुरांना घेऊन जात असलेल्या सुमोने महामार्गावरील ट्रकला धडक दिल्याने सुमोतील ११ महिला व एक पुरुष असे १२ जण जखमी झाले आहेत. यात सहा जण गंभीर जखमी असून त्यांना चिमूर तालुक्यातील भिसी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शोभा अशोक पेंदाम (६०), अनिता विजय मेश्राम (३५), प्रिया बालाजी कुंभरे (३२), कल्पना राहुल चटपकार (३१), कविता घनश्याम बारसागडे (४५), रंजना गुलाब सहारे (४०), बेबी पेंदाम (६०), माया रामकृष्ण सावसाकडे (४२), सिंधू मनोहर पेंदाम (६०), रंजना जगदीश मेश्राम (४०), मंगला राजू मसराम (३६), राकेश रमेश धानोरकर (२८) अशी जखमींची नावे असून सर्व पिंपळनेरी-पेठ येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार चिमूर तालुक्यातील पेठ येथील महिला मजूर एम. एच.२९-ए.डी.०३०७ क्रमांकाच्या सुमोने उमरेड तालुक्यातील आंबोली येथे मिरची तोडणी साठी गेले होते. दरम्यान, गावाकडे जात असताना रात्री ७:३० सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३५३-ई वरील मालेवाडा परिसरात टायर कंपनीजवळ ट्रक क्रमांकआर.जे.११-जी.बी-०९३० ला धडक दिली. यात सुमोतील सर्व मजूर जखमी झाले. लागलीच गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना चिमूर तालुक्यातील भिसी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती भिसी पोलीसांनी भिवापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांना दिली असता पोलिस पथकासह घटनास्थळ तात्काळ दाखल झाले.
0 Response to "सुमोची ट्रकला धडक - अपघातात १२ मजूर जखमी."
एक टिप्पणी भेजें