-->
मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा आज वाडेगावात भव्य समारोप.

मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा आज वाडेगावात भव्य समारोप.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी 

अकोला :- मराठा पाटील समाजात वैचारिक प्रबोधन, सामाजिक संवाद आणि एकतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा आज प्रजासत्ताक दिनी , २६ जानेवारी २०२६ रोजी वाडेगाव येथे भव्य व प्रेरणादायी समारोप होत आहे.ही संवाद पदयात्रा स्व. राजदत्त गुरुदत्त मानकर, संस्थापक अध्यक्ष, मराठा पाटील समाज संघ तालुका बाळापूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आली असून, १७ जानेवारी २०२६ रोजी काजीखेड येथून तिचा प्रारंभ झाला. तालुक्यातील विविध गावांतून मार्गक्रमण करत समाजातील प्रश्न, अपेक्षा, अडचणी व उपायांवर संवाद साधत ही पदयात्रा आज वाडेगाव येथे दाखल होत आहे.
आज सकाळी ९.०० वाजता योगेश पाटील भटकर यांच्या निवासस्थानावरून टाळ–मृदुंगाच्या गजरात, वारकरी परंपरेची अनुभूती देणारी संवाद पदयात्रा (दिंडी) वाडेगावच्या प्रमुख मार्गांवरून निघणार असून, तिचा समारोप श्री जागेश्वर मंदिर, वाडेगाव येथे होणार आहे.स्व. राजदत्त मानकर यांच्या प्रथम जयंती दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरांतील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या संवेदना व्यक्त कराव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. समाजहितासाठी अखंड कार्यरत असलेल्या स्व. मानकर यांच्या विचारांना आणि कार्याला ही पदयात्रा एक भावपूर्ण मानवंदना ठरत आहे.
समारोप कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून, हा कार्यक्रम समाजबंध अधिक दृढ करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हा समारोप सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त पाटील समाज, वाडेगाव परिश्रम घेत असून, समाजातील सर्व बांधवांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन मराठा पाटील संघाचे तालुका अध्यक्ष शरद वानखडे यांनी केले आहे.


0 Response to "मराठा पाटील समाज संवाद पदयात्रेचा आज वाडेगावात भव्य समारोप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article