-->
पोलीस विभागातील उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर.

पोलीस विभागातील उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर.


पालकमंत्री संजय सावकारे व जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या हस्ते सत्कार.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :-- पोलीस मुख्यालयातील राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक गंगाधर रामचंद्र घुमरे यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे .पूर परिस्थिती काळात मदत, खून,दरोडा, चोरी प्रकरणात गुप्त माहिती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका तसेच निवडणूक काळात दिलेल्या माहितीच्या आधारे शासनाला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता त्यांना 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे 1991 बॅचचे पोलीस अंमलदार असून त्यांनी पवनी, गोंदिया शहर, तुमसर व राज्य गुप्त विभागात काम केलेले आहे. पूर्वी त्यांना 2021 मध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते DG INSIGNIA पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

0 Response to "पोलीस विभागातील उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article