-->
सगरोळी रेती घाटच्या ओव्हरलोड वाहतूकीवर दंडात्मक कारवाईची मागणी.

सगरोळी रेती घाटच्या ओव्हरलोड वाहतूकीवर दंडात्मक कारवाईची मागणी.

.                   ओरलोड रेती वाहतूक 
 
गंगाधरराव वि.शेवाळकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

शहापूर :- बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेती घाटावरून ओव्हरलोड रेती वाहतूक नुकतेच सुरू झाले असून हि रेती वाहतूक दिवस रात्र चालत असल्याचे दिसून येत आहे ओव्हरलोड रेती वाहतूक शेवाळा -शहापूर -वन्नाळी -नरंगल आदि मार्गावरून सुरू असल्याचे दिसून येत आहे खानापूर फाटा ते शेळगाव दरम्यानच्या रस्ता मजबुतीकरणाच्या कामावर संबंधित विभागाने १०० कोटी हून अधिक निधी खर्च केले आहे या दोन पदरी मार्गावरून आंतर राज्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालत असते मात्र अशा ओव्हरलोड रेती वाहतूकीमुळे शेळगाव ते खानापूर फाटा या दरम्यानच्या रस्त्याची ओव्हरलोड रेती वाहतूकीमुळे दैन्यावस्था बनण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पण परिवहन , महसूल व पोलीस प्रशासन ओव्हरलोड रेती वाहतूक प्रकरणी कुंभकर्णी अवस्थेतच दिसून येत आहेत सगरोळी घाटावरचे रेती चालक महाशय प्रत्येक टिप्पर मध्ये नियमबाह्यरित्या मर्यादा पेक्षा जादा वाळूचे भरणा करीत आहेत तेव्हा या ओव्हरलोड रेती वाहतूकीस मुख्य रेती घाट चालकच दोषी असल्याचे दिसून येत आहे शेवाळा -आलूर -शहापूर -वन्नाळी तसेच शेवाळा -नरंगल -हनुमान हिप्परगा या आंतर राज्य प्रमुख मार्गावरून अवेळी व चोवीस तास रेती या रोड साठी मी अनेक वेळी अमरण उपोषणास बसलो आहे आणि पाठपुरावा केला आहे. वाहतूक चालू आहे असे असताना पण या रस्त्याची लवकरच वाट लागेल व रोड लवकरच खराब होण्याची दाट श्यकता आहे.म्हणुन उपविभागीय जिल्हा अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार यांना वाळू घाट चालक व टिप्पर चालक हे सर्व हाताशी धरून अवैध व ओव्हरलोड रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत आहेत अशी चर्चा सर्वत्र होत आहे संबंधित रेती घाटावरून ओव्हरलोड रेती वाहतूकीतील टिप्परची संख्या 150 हून अधिक असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे तेव्हा या ओव्हरलोड रेती वाहतूकीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) तसेच मा. जिल्हाधिकारी,आणि पोलिस उपमहानिरीक्षक, जिल्हा पोलिस तसेच उपविभागीय अधिकारी,महसूल
विभाग तहसीलदार, अधीक्षक यांनी त्वरीत लक्ष देवून सगरोळी रेती घाट चालकावर ओव्हरलोड रेती वाहतूक प्रकरणी ५ लक्ष रूपयांचे दंड थोटवावेत व ओव्हरलोड रेती वाहतूकीतील सर्व टिप्पर वर दंडात्मक कारवाई करावेत अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

0 Response to "सगरोळी रेती घाटच्या ओव्हरलोड वाहतूकीवर दंडात्मक कारवाईची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article