घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासा! तुमसर तालुक्यात ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध.
गुरुवार, 22 जनवरी 2026
Comment
११ रेतिघाटांना मंजुरी; e-TP पासशिवाय वाळू उचलता येणार नाही.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर शासकीय घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय अंमलात आणण्यात आला आहे. त्यानुसार तुमसर तालुक्यातील ११ अधिकृत रेतिघाटांवरून घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यात येणार आहे.तुमसर तालुक्यात जवळपास ४८०० लाभार्थी ची यादी पंचायत समिती, तुमसर कडून प्राप्त आहे.
कोण पात्र आहेत?
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण / शहरी) लाभार्थी,शासन मान्य इतर घरकुल योजनांतील लाभार्थी ,ज्यांचे घरकुल बांधकाम प्रत्यक्ष सुरू आहे किंवा मंजूर आहे.
मोफत वाळू कुठून मिळेल?
घरकुल लाभार्थ्यांना पुढील ११ अधिकृत रेतिघाटांवरूनच वाळू मिळणार आहे :
सुकळी दे-2, माडगी, ढोरवाडा, उमरवाडा-2, वारपिंडकेपार-2, लोभी-4, लोभी-5, आष्टी, मांडवी, डोंगरी बु-3 व पांजरा दे-2.
e-TP (Royalty Pass) पास अनिवार्य
घरकुल लाभार्थ्यांना वाळू उचलण्यासाठी
ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत e-TP (Royalty Pass) निर्गमित केला जाणार आहे.ही प्रक्रिया २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.e-TP पासशिवाय वाळू वाहतूक केल्यास ती बेकायदेशीर ठरणार आहे.
लाभार्थ्यांनी काय करावे?
महाखनिज पोर्टल वर आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवावा,स्वतः ट्रॅक्टर व मजुरांची व्यवस्था करावी, नेमून दिलेल्या रेतिघाटावरूनच वाळू उचलावी.
महत्त्वाचा इशारा
घरकुल लाभार्थ्यांनी,अनाधिकृत व्यक्ति कड़ून वाळू खरेदी करू नये,परवानगीशिवाय इतर ठिकाणची वाळू वापरू नये.
अनुज्ञेय वाळू व्यतिरिक्त इतरत्रून वाळू घेतल्यास संबंधित लाभार्थ्यावर
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ व
भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
घरकुल लाभार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
मोफत वाळूमुळे बांधकाम खर्चात बचत होईल.वेळेत घरकुल पूर्ण करण्यास मदत होईल.घरकुल लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुमसर तहसीलचे तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे यांनी केले आहे.
0 Response to "घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासा! तुमसर तालुक्यात ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध."
एक टिप्पणी भेजें