भीमा कोरेगाव शौर्यदिनाची आठ वर्षांची परंपरा कायम.
रविवार, 4 जनवरी 2026
Comment
• कारंजात विजयस्तंभाला मानवंदना.
"साताहीक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
कारंजा :- शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची प्रतिकृती कारंजा येथील १ जानेवारी रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारण्यात आली होती. या विजयस्तंभाला सकाळपासूनच हजारो अनुयायांनी मानवंदना देत शौर्यवीरांना अभिवादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे जाऊन शौर्यवीरांना सलामी देत असत. त्याच परंपरेचा वारसा आजही अनुयायी जपताना दिसत आहे. लाखो अनुयायी प्रत्यक्ष भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन करतात. मात्र ज्यांना प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी समाजक्रांती आघाडीचे अध्यक्ष हंसराज शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी
कारंजा शहरातच भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्याची संकल्पना राबविली. ही प्रतिकृती आयुष्यमान विजय वानखडे, तरुण कुमार शिरसाट व नरेंद्र ठोंबरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येते. यावेळी समता सैनिक दलाच्या महिला हिवराळे व बेलखेडे या समता सैनिक दलाच्या सैनिकांसह विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महादेव ठोंबरे, अॅड. मिलिंद खंडारे, किशोर मानकर, शुभम बागडे व त्यांचे सहकारी, भारत भगत, सारंग पेचकाळे, आसिफ खान, विलास शिरसाट, वैभव पांडे, विनायक पदमगिरीवार यांच्यासह भीमनगर, गौतम नगर, अशोक नगर, पंचशील नगर, राहुल नगर, सिद्धार्थ नगर, शिक्षक कॉलनी आदी परिसरातील नागरिक व आंबेडकरी अनुयायांनी दिवसभर सहभाग नोंदविला.
शौर्यदिनानिमित्त हजारो अनुयायांचा सहभाग
मागील आठ वर्षांपासून कारंजा शहरात ही परंपरा सातत्याने सुरू असून दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शौर्यवीरांच्या विजयस्तंभाला सन्मान व स्वाभिमानाची सलामी देण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होत असते. यावर्षीदेखील हेच चित्र पाहायला मिळाले. शौर्य दिनानिमित्त आयोजित या मानवंदना कार्यक्रमामुळे कारंजा शहरात दिवसभर अभिमान, इतिहास आणि स्वाभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Response to "भीमा कोरेगाव शौर्यदिनाची आठ वर्षांची परंपरा कायम."
एक टिप्पणी भेजें