-->
तुमसर तालुक्यात निवडणुकीचा धुराळा उडणार!.

तुमसर तालुक्यात निवडणुकीचा धुराळा उडणार!.

गट ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा उलट मोजनी (countdown) सुरू.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर/सिहोरा :- तुमसर तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून मुदत संपणाऱ्या गट ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या प्रभाग रचने चे पडघम वाजू लागले आहेत. प्रशासकीय स्तरावर प्रभाग रचनेच्या हालचालींना वेग आल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे आता नव्या वळणावर येऊन ठेपली आहेत. नव्या वर्षाच्या प्रारंभीच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय आणि पंचायत विभागाने लोकसंख्येच्या निकषावर आधारित वॉर्डाची फेररचना करण्याचे काम हाती घेतले असून, यामुळे प्रस्थापित गावपुढाऱ्यांसह इच्छुकांमध्ये मोठी धाकधूक पाहायला मिळत आहे.

विशेषतः एक किंवा अधिक गावांचा समावेश असलेल्या गट ग्रामपंचायतींमध्ये वॉर्डाच्या सीमा कशा निश्चित होतात, यावरच हार-जीत अवलंबून असल्याने स्थानिक पातळीवर प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. आपल्या हक्काचा मतांचा मोठा गट दुसऱ्या वॉर्डात विभागला जाऊ नये, यासाठी अनेक बुढाऱ्यांनी आतापासूनच तहसील कार्यालयात फिल्डिंग लावली असून प्रभाग रचनेच्या कच्च्या बाराखड्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. कसंख्येतील वाढ आणि नियमांमधील तांत्रिक दलांमुळे जुन्या वॉर्डाच्या सीमा बदलण्याची दाट क्यता असून, यामुळे नवीन प्रभागांची निर्मिती होऊन न्या सदस्यांचे बालेकिल्ले धोक्यात येण्याची क्यता वर्तवली जात आहे.

- प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी अखेरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा मसुदा प्रसिद्ध होऊ शकतो. त्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये हरकती व सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्यात येईल. मार्च महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम मंजुरीनंतर वॉर्डाचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. जर ही संपूर्ण प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली, तर एप्रिल ते मे २०२६ या कालावधीत तुमसर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी या निवडणुका उरकून घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस असल्याने प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. सध्या खेड्यापाड्यातील चहाच्या टपरीपासून ते ग्रामपंचायतीच्या पारापर्यंत केवळ 'आरक्षण' आणि 'वॉर्ड रचना' यावरच चर्चा रंगत असून, या प्रक्रियेत कोणाचे राजकीय भविष्य सुरक्षित राहणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

0 Response to "तुमसर तालुक्यात निवडणुकीचा धुराळा उडणार!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article