-->
चांदपूर तलावात बुडणारी कार अन् दोघा बालेकानां वाचविले.

चांदपूर तलावात बुडणारी कार अन् दोघा बालेकानां वाचविले.

सिहोरा पोलिसांचे धाडसी रेस्क्यू; थक्क करणारी कामगिरी!‌

१७ वर्षीय सामील कोहळे बाल शोर्य व पोलीसांनी दिले दोघा बापलेकानां जीवनदान.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी 

 तुमसर :- हरदोली (सिहोरा) वर्षाचा पहिला शनिवार आणि चांदपूर हनुमान देवस्थानची यात्रा... हजारो भक्तांची गर्दी असतानाच एका क्षणात आनंदाचे रूपांतर भीतीमध्ये झाले. मात्र, सिहोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आणि एका स्थानिक तरुणाने दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे आज एक मोठा अनर्थ टळला. तलावात बुडणाऱ्या कारमधून बाप-लेकाचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भज्जेपार येथील रहिवासी श्रीकृष्ण नथू रहांगडाले हे आपल्या परिवारासह दि. ३ जानेवारी २०२६ ला चांदपूर हनुमान देवस्थान येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परतत असताना आपली सँट्रो कार क्र. एम.एच. ३१/सीएस १२९९ वळवत असताना

अचानक एक्सीलेटरवर पाय जास्त दबला गेला. यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नजीकच्या खोल तलावात जाऊन कोसळली.

पोलीस बनले देवदूत : कार पाण्यात बुडत असल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, तिथेच बंदोबस्तावर तैनात असलेले सिहोरा

पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनील कासदा (ब.नं. ८८१) आणि पोलीस शिपाई रवींद्र सव्वालाखे (ब.नं. ११६५) यांनी क्षणाचाही विलंब

न लावता गणवेशातच तलावात उड्या घेतल्या. त्यांच्या मदतीला स्थानिक १७ वर्षीय तरुण साहिल कोहळे हा देखील धावून गेला.

या तिघांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडणाऱ्या कारमधून चालक श्रीकृष्ण रहांगडाले आणि त्यांचा मुलगा ओम' यांना सुखरूप बाहेर काढले. काही वेळ उशीर झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, मात्र या वीरांच्या सतर्कतेमुळे दोन्ही पिता-पुत्र सुखरूप आहेत. दोघांनाही सुरक्षित बाहेर काढल्यानंतर, स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. सिहोरा पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे आणि तरुण साहिल कोहळे याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'खाकी'मधील माणुसकी आणि सतर्कतेमुळे एका कुटुंबाचा आधार वाचल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.तसेच सिहोरा पोलीस व साहील कोहळे यांनी जीवाची परवा न  करता त्यांचे गत प्राण वाचवी ल्यामुळे परिसरात कौतुक होत आहे.

0 Response to "चांदपूर तलावात बुडणारी कार अन् दोघा बालेकानां वाचविले."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article