-->
​नागपूर पदवीधरसाठी इंजि.अतुल दिनकर देशमुख यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर.

​नागपूर पदवीधरसाठी इंजि.अतुल दिनकर देशमुख यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर.

• शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा; दिनदर्शिकेचेही प्रकाशन.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- ​भंडारा येथील जिल्हा परिषद शासकीय कर्मचारी ग्राहक सोसायटीमध्ये १७ जानेवारी रोजी 'शिक्षक भारती' या शासनमान्य संघटनेची महत्त्वाची सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत बेरोजगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक भारतीचे विदर्भ समन्वयक तथा ओबीसी मुक्ती मोर्च्याचे प्रदेश अध्यक्ष इंजि.अतुल दिनकर देशमुख यांनी आगामी नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवावी, असा ठराव जिल्हा कार्यकारिणीत एकमताने मंजूर करण्यात आला.
​दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि प्रमुख उपस्थिती
​सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ समन्वयक अतुल देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, ओबीसी जेष्ठ नेते प्रशांत ढोरे,विभागीय संघटक प्रविण गजभिये, जिल्हाध्यक्ष उमेश सिंगनजुडे, रवींद्र पटले, प्रा. विनोद हटवार, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे, आणि बेरोजगार संघटनेचे संजय मते उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक भारती संघटनेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
​बेरोजगारांच्या संघर्षासाठी सज्ज : अतुल देशमुख
​यावेळी मार्गदर्शन करताना अतुल देशमुख म्हणाले की, "आजचा सुशिक्षित तरुण रोजगारासाठी भटकत आहे. बेरोजगार तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी मी शेवटपर्यंत संघर्ष करेन. लवकरच एक भव्य बेरोजगार मेळावा आयोजित करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे."
​मतदार नोंदणीवर दिला भर
​सभेत भाऊराव पत्रे, के. झेड. शेंडे, उमेश सिंगनजुडे, प्रविण गजभिये आणि रविंद्र पटले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जाऊन मार्गदर्शन करण्याचा व सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
​कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
​या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश धुर्वे, राकेश झोडे, प्रा. निशिकांत ईश्वरकर, प्रा. जितेंद्र टिचकुले, हरेश देशमुख, विशाल फुले, देवराम फटे, हितेंद्र लंजे, देवेंद्र शेंडे, खेमराज परशुरामकर, राजेश निनावे, पवन सार्वे, राजेश भालेराव, प्रा. रुपलाल पटले, डी. ए. जुगनाके, वंदना बनकर, बालू भुते, नितेश पुरी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद किंदर्ले यांनी केले, तर आभार जवाहर मुंगुसमारे यांनी मानले.

0 Response to "​नागपूर पदवीधरसाठी इंजि.अतुल दिनकर देशमुख यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article