लाखनी येथे माळी समाजाचे स्नेहसंमेलन व गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न.
रविवार, 18 जनवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- लाखनी येथील बळगे सेलिब्रेशन हॉल, केसलवाडा फाटा येथे माळी समाज समिती लाखनीच्या वतीने दिनांक १७ जानेवारी रोजी स्नेहसंमेलन, हळदीकुंकू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि शैक्षणिक प्रगतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष माननीय डॉ. श्रीकांत भुसारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. सौ. विजयाताई नंदुरकर (नगरपरिषद पवनी), माजी सरपंच जयश्रीताई बारस्कर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ इटवले, नवनिर्वाचित नगरसेवक नितीनभाऊ गायधने, तसेच विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी तसेच सेवानिवृत्त मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण केले, तर युट्युबस्टार प्रज्वल सावरकर यांनी समाजप्रबोधनात्मक नाट्य सादर केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. प्रास्ताविक अध्यक्ष गंगाधर भुसारी यांनी केले, संचालन कुमारी भाग्यश्री किरणापुरे यांनी तर आभार चंद्रशेखर भुसारी यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील विविध गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "लाखनी येथे माळी समाजाचे स्नेहसंमेलन व गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न."
एक टिप्पणी भेजें