भंडारा जिल्ह्यातील शांतीवन बुद्धविहार चिचाळ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
सोमवार, 26 जनवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 ला प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भदंत विनय बोधी महाथेरो ,भदंत नागसेन महाथेरो ,शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संविधानाची पूजन करून भारतरत्न, बोधिसत्व, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भदंत विनयबोधी महाथेरो व भदंत नागसेन महाथेरो यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम, तुलसीदास गवलीकर,प्रमोद मेश्राम, अभय डोंगरे, अशोक डोंगरे,अंबादास मेश्राम, व अनेक कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "भंडारा जिल्ह्यातील शांतीवन बुद्धविहार चिचाळ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. "
एक टिप्पणी भेजें