पालांदूर ग्रामीण रुग्णालयाला क्ष किरण मशीन करिता होल्टेज स्टॅबिलायझर पुरवा.
शुक्रवार, 23 जनवरी 2026
Comment
सरपंच गणेश हत्तीमारे यांचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना मागणी.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यात क्ष किरण अर्थात एक्स-रे मशीन कार्यरत आहे. मात्र खंडित वीजपुरवठ्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत ठरते. करिता रुग्णालयातील क्ष किरण विभागात एक्स-रे मशीन सुरळीतपणे सुरू राहण्याकरिता ताण नियमक (होल्टेज स्टॅबिलायझर मशीन) गरजेची आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या आधारावर शासनाच्या वतीने पुरविण्यात येणारी आरोग्य सेवा वाढविणे गरजेचे आहे. सर्वसामान्य ग्रामीण विभागातील गोरगरीब जनता एक्स-रे घेण्याकरिता तालुका किंवा जिल्ह्याला जाऊ शकत नाही. याची दखल गोंदी ढिवरखेड्याचे सरपंच गणेश हत्तीमारे यांनी स्वतः मनावर घेत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून एक्स-रे मशीन मंजूर करून सुरू सुद्धा केलेली आहे विशेष!.
खंडित पुरवठ्याने समस्या...
पालांदूर व परिसरात खंडित विजेची समस्या तयार आहे. वीज खंडित झाली तर रुग्णांना वेळेत एक्स-रे सेवा मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था गरजेची आहे. जिल्हा शल्ल्य चिकित्सक भंडारा यांना निवेदन देत मागणी केलेली आहे.
0 Response to "पालांदूर ग्रामीण रुग्णालयाला क्ष किरण मशीन करिता होल्टेज स्टॅबिलायझर पुरवा. "
एक टिप्पणी भेजें