अंधश्रद्धा निर्मूलनातील उल्लेखनीय कार्याबद्दल डी. जी. रंगारी सन्मानित.
रविवार, 18 जनवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
साकोली :- अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढ्यात गेली तीन दशके अखंड झुंज देणारे साकोली येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी. जी. रंगारी यांचा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) तर्फे 'अंनिस कार्यगौरव पुरस्कार २०२६' देऊन गौरव करण्यात आला. कुंभली यात्रेतील दुर्गाबाई (दुर्गाबाईचा डोह) येथे पार पडलेल्या या सोहळ्यात पोलीस उपविभागीय अधिकारी शिवम ईसापुर व थानेदार महादेव आचरेकर यांच्या हस्ते रंगारी यांचा सन्मान करण्यात आला.डी. जी. रंगारी हे गेल्या ३० वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत अग्रभागी राहून कार्यरत आहेत. दुर्गाबाईचा डोह परिसरात चालणाऱ्या अंधश्रद्धांविरोधात त्यांनी सातत्याने प्रबोधन केले. तसेच महाविद्यालये, कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करत समाजात परिवर्तन घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. पत्रकार म्हणूनही त्यांच्या निर्भीड लेखनामुळे परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.या कार्यक्रमास भंडारा जिल्हा अध्यक्ष रामभाऊ येवले, रत्नाकर तिडके, अंनिसचे जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा उपाध्यक्ष गयानचंद जांभुळकर, माजी सभापती रेखा वासनिक, उज्वल व्यसनमुक्ती केंद्र साकोलीच्या संचालिका उषा घोडेस्वार, सामाजिक कार्यकर्त्या तनुजा नागदेवे, महिला जिल्हा संघटक प्रियाताई शहारे, साकोली तालुका महिला संघटक कल्पना सांगोडे, यशवंत उपरीकर, कागदरावर रंगारी, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या अध्यक्ष शीतल नागदेवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंधश्रद्धेविरोधातील संघर्षाला मिळालेल्या या सन्मानामुळे तरुण पिढीला वैज्ञानिक विचारांची नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला
0 Response to "अंधश्रद्धा निर्मूलनातील उल्लेखनीय कार्याबद्दल डी. जी. रंगारी सन्मानित."
एक टिप्पणी भेजें