मी पण अधिकारी होऊ शकतो:- अखिल सर.
रविवार, 18 जनवरी 2026
Comment
• शारदा विद्यालय, तुमसर येथे जिजाऊ–विवेकानंद जयंती निमित्ताने प्रतिपादन
• अखिल सरांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये ‘अधिकारी होण्याचा’ संकल्प.
"साप्ताहिक जनता की आवाज
"वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर (प्रतिनिधी) :- शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या जीवनदृष्टीला नवी दिशा दिली. MPSC HUB ACADEMY चे संचालक, लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अखिल सर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ध्येयदृष्टी व अधिकारी होण्याची जिद्द निर्माण झाली.
मार्गदर्शन करताना अखिल सर म्हणाले, “जिजाऊंनी शिवराय घडवले आणि विवेकानंदांनी युवक घडवले; आज त्या विचारांवर चालणारा प्रत्येक विद्यार्थी उद्याचा IAS, IPS अधिकारी होऊ शकतो.”
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये स्वराज्याचे संस्कार रुजवले, तर स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण युवा पिढीला आत्मविश्वासाचा मंत्र दिला, असे सांगत अखिल सरांनी दहावी–बारावीपासूनच मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले “उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील विद्यार्थी अधिकारी होतात, मग भंडारा, गोंदिया, नागपूरसारख्या विदर्भातील विद्यार्थी IAS, IPS, DYSP, तहसीलदार का होऊ नयेत?”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, नृत्य व गायनातून जिजाऊ व विवेकानंदांचे विचार प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीझा हेडाऊ हिने केले, तर नृत्य सादरीकरण विपशी बागडे हिने केले.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर
हर्षा अगाशे, प्रिन्सी मोटघरे, कनक बिरनवारे, सानू हरगुडे, वैष्णवी गोंधुळे, नैना तहेकर, अनुष्का राऊत, हर्षाली शरणागत या विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ वेशभूषेत काव्या बडवाईक हिने सादरीकरण केले.
जिजाऊ वंदना नृत्य – श्रेया कनपटे, अदिती मने यांनी सादर केले.
जिजाऊंच्या कार्यावर
मयूर कोकोडे, देवव्रत गाढवे, कृष्णप्रसाद पारधी, दिशांत ढोके, क्रिश पटले, आदित्य ठाकरे, समर कोल्हे, गौरव हटवार, उत्कर्ष कारेमोरे, सत्यम भोंगाडे, डिम्पल आरजे या विद्यार्थ्यांनी विचार मांडले.
गायन – माही गाढवे व आरुषी गाडवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य राहूल डोंगरे होते. त्यांनी अखिल सरांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करत सांगितले की, “अशा प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची ताकद मिळते.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राम बोपचे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न राहता, विद्यार्थ्यांच्या मनात ‘मीही अधिकारी होऊ शकतो’ हा आत्मविश्वास जागवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला, हे विशेष! कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्योती बावनकर, दिपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, अशोक खंगार, अंकलेश तिजारे, नितुवर्षा मुकुर्णे, प्रीती भोयर, विद्या मस्के,सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, बेनिता रंगारी, नेहा बारई, दिपक बालपांडे, नारायण मोहनकर, झनकेश्वरी सोनवणे, विद्या देशमुख, बंदिनी, दाते बाई व मानकर बाई यांनी सहकार्य केले.
0 Response to "मी पण अधिकारी होऊ शकतो:- अखिल सर."
एक टिप्पणी भेजें