CNE, आणि CPD नूतनीकरणच्या नावाखाली परिचारिकांवर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी.
मंगलवार, 27 जनवरी 2026
Comment
मागणी पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी चरणबद्ध जनआंदोलन
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा :- शासन आणि प्रशासनाने तुघलकी निर्णय घेऊन परिचारिकांना 30 क्रेडिट कार्ड किंवा 150 तास(एका वर्षात किमान 30 तास व कमाल 60 तास कन्टीन्यूव नर्सिंग एज्यूकेशन CNE व कन्टीन्यूव प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPD ची अमानवी शक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील लाखो नोंदणीकृत परिचरिकाना आर्थिक, मानसिक, सामाजिक शोषणाला सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो आहे, अप्रत्यक्ष पणे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला ही वेळेवर कर्मचारी उपस्थित न राहल्याने त्रास होत आहे ,याविषयी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना (RMBKS) च्या माध्यमातून अनेकदा निवेदने देण्यात आली, मात्र काही फायदा नाही, त्यामुळे राज्यव्यापी चरणबद्ध आंदोलन करण्यात येणार आहे,1)दिनांक 26-1-2026 ला गणराज्य दिनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
2)12-5-2026 आंतरराष्ट्रीय परिचरिका दिनी आझाद मैदान मुंबई येते धरणे आंदोलन
3)15-8-2026 स्वतंत्र दिनी आझाद मैदान ते मंत्रालय मुंबई येते महामोर्चा करण्यात येणार असल्याचे निवेदन राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना च्या माध्यमातून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री,सार्वजनिक आरोग्य मंत्री,ग्रामविकास मंत्री यांना देण्यात आले, यावेळी असंख्य कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "CNE, आणि CPD नूतनीकरणच्या नावाखाली परिचारिकांवर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी."
एक टिप्पणी भेजें