-->
महिला नगरसेविकांच्या कामकाजात पतींचा हस्तक्षेप?

महिला नगरसेविकांच्या कामकाजात पतींचा हस्तक्षेप?


• भारतीय दलित महासंघाचा आंदोलनाचा इशारा.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्युज नेटवर्क
 
कागल :- कागल नगर परिषदेमधील नवनिर्वाचित महिला नगरसेविकांच्या नावावर प्रत्यक्ष कारभार त्यांच्या पती अथवा नातेवाईकांकडून चालवला जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या असून, या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास भारतीय दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) अनिल अर्जुन पुजारी यांनी याबाबत कागल नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महिला आरक्षणाचा उद्देश महिलांना स्वतंत्र, स्वायत्त आणि निर्णयक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संधी देण्याचा आहे. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणी महिला नगरसेविकांच्या नावावर पती किंवा नातेवाईक निर्णय घेत असल्याच्या चर्चा असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे.

की, पती अथवा नातेवाईकांचा असा हस्तक्षेप हा भारतीय संविधानातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित तरतुदीचा भंग करणारा असून, महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमाच्या विरोधात जाणारा आहे. तसेच हा प्रकार लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

भारतीय दलित महासंघाने या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्या महिला नगरसेविकांविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच नगर परिषद कार्यालय व सभांमध्ये पती किंवा नातेवाईकांचा कोणताही हस्तक्षेप होणार नाही, याबाबत स्पष्ट लेखी आदेश काढण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या गंभीर बाबींची दखल घेऊन त्वरित ठोस कारवाई न झाल्यास, लोकशाही मार्गान आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात

0 Response to "महिला नगरसेविकांच्या कामकाजात पतींचा हस्तक्षेप?"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article